बुलडाणा जिल्ह्यातील २३८ विद्यार्थ्यांना मिळणार आधार
By Admin | Published: July 17, 2014 11:05 PM2014-07-17T23:05:00+5:302014-07-17T23:59:00+5:30
सर्वशिक्षा अभियान : अपंग व कर्णबधिर विद्यार्थ्यांचा समावेश.
खामगाव : सर्वशिक्षा अभियान अंतर्गत विशेष गरजा असणार्या अपंग व कर्णबधिर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर तज्ज्ञ पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील २३८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सर्वशिक्षा अभियानातील अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अपंग विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विशेष शिक्षक नेमून देण्यात आलेले आहेत. शाळेतील तसेच शाळाबाह्य 0 ते १८ वयोगटातील सर्वच गतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग व कर्णबधिर विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य शिक्षण विभागाच्यावतीने मोफत देण्यात येते.
जिल्हास्तरावर जबलपूर येथील अलिम्को तज्ज्ञ पथकामार्फत साहित्य साधने व उपकरणाकरिता मोजमाप घेण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील चिखली तालुक्यातून ६0 विद्यार्थी, देऊळगावराजा २0 विद्यार्थी, सिंदखेडराजा २१, बुलडाणा १९, लोणार ५0, मेहकर १३0, खामगाव ४५, शेगाव १८, संग्रामपूर ३0, जळगाव जामोद १४, नांदुरा २४, मलकापूर २४ तर मोताळा तालुक्यातील १३ विद्यार्थी असे एकूण ४६८ विद्यार्थ्यांची निवड तालुकास्तरावरुन करण्यात आली होती. या ४६८ विद्यार्थ्यांंपैकी २३८ विद्यार्थ्यांची साहित्य साधने व उपकरणाकरिता निवड करण्यात आली आहे.