मलकापूर तालुक्यात २४ गॅस सिलिंडरसह मुद्देमाल जप्त, देवधाब्यात पोलिसांची कारवाई
By योगेश देऊळकार | Updated: September 17, 2023 21:56 IST2023-09-17T21:55:36+5:302023-09-17T21:56:19+5:30
तालुक्यातील देवधाबा येथे स्थानिक गु्न्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने शनिवारी (दि. १६) दुपारी ही कारवाई केली.

मलकापूर तालुक्यात २४ गॅस सिलिंडरसह मुद्देमाल जप्त, देवधाब्यात पोलिसांची कारवाई
मलकापूर : बेकायदेशीर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना पकडण्यात व ज्वालाग्राही पदार्थ विनापरवाना वापर करताना एकास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याजवळून २४ गॅस सिलिंडर व ७ लिटर पेट्रोल असा ६१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तालुक्यातील देवधाबा येथे स्थानिक गु्न्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने शनिवारी (दि. १६) दुपारी ही कारवाई केली.
कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, सुरक्षेचे उपाय न करता गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. त्याचबरोबर ज्वालाग्राही पदार्थांचा विनापरवाना वापर केला जातो. या माहितीवरून स्थागुशा बुलढाणा पथक शनिवारी मलकापुरात दाखल झाले. देवधाबा येथील सचिन गणेश महाजन (२७) याला राहत्या घराजवळ तीन चाकी व चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या जवळील भरलेले ४ व रिकामे २० असे एकूण २४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर विनापरवाना वापरात असलेले ७ लिटर पेट्रोल असा ६१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस काॅन्स्टेबल गणेश सुकदेव शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गणेश महाजन यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.