भरधाव ट्रकची खासगी बसला धडक, अमरावतीचे २५ भाविक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 09:27 PM2018-05-25T21:27:26+5:302018-05-25T21:27:26+5:30
ट्रकने दिलेल्या धडकेत खासगी बसमधील२५ भाविक जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बिरला कॉटसीन कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
- हनुमान जगताप
बुलडाणा - ट्रकने दिलेल्या धडकेत खासगी बसमधील२५ भाविक जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर बिरला कॉटसीन कंपनीजवळ शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमीत आबालवृध्दांचा समावेश आहे. त्यातील ६ जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना बुलडाणा / अकोला हलविण्यात आले असून इतरांवर स्थानीय उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती व वर्धा या जिल्ह्यातील भाविक नातेगोत्यांच्या माणसांसह शुक्रवारी सकाळी वणीगड (नाशिक) या तिर्थाचे दर्शन घेवून मिनीबस क्र.एमएच२७-ए-९९०५ या खाजगी वाहनाने परतीच्या वाटेवर होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मिनीबसची जबर धडक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर मालवाहतूक करणाºया ट्रक क्र.आर.जे.१९-जीबी ८२८२ याच्याशी झाली.
सदरची धडक एवढी जबरदस्त होती की, मिनीबसच्या चालकाच्या बाजुच्या भागाचा अक्षरश: चेंदाचेंदा झाला. त्यात मनोजकुमार मनोहर इरणकर (वय ४०) यशोदानगर अमरावती, रंजना मनोहर इरणकर (वय ३८), नामदेव जयराम इरणकर (वय ६५), राजकुमार भालेरावजी बाळगुधे (वय ५२), राऊत नगर नागपूर, उज्वला रविंद्र चापेकर (वय ३८) भद्रावती चंद्रपूर, वंदना रामेश्वर समर्थ (वय ३४) रा.मोजरी अमरावती, निर्मला रामकृष्णा भुरे (वय ६०), रा.करवाडी चांदुरबाजार, सुधाकर महादेवराव अंबुलकर (वय ६०), रा.मोर्शी अमरावती, सुमन सुधाकर अंबलकर (वय ५५), मैनाबाई मारोतराव लांजेवार (वय ७०), आर्वी वर्धा, कुसुम सुरेश ढोबळे (वय ४७) रा. खरवाडी चांदुरबाजार, रामकृष्ण शिवराम भुरे (वय ७३) रा.खरवाडी ता.चांदुरबाजार, राजेंद्र दयाराम वैद्य (वय ४२) रा.शिवणी रसुलपूर रा.नांदगाव खंडेश्वर, सिध्दार्थ राजेंद्र वैद्य (वय ७), सोनाली राजेंद्र वैद्य (वय ३०) रा.शिवणी रसुलपूर नांदगाव खंडेश्वर, मयुरी किशोर ढोबळे (वय १९) रा.बाभुळगाव, मुक्ता नामदेवराव हरणकर (वय ५८) रा.यशोदा नगर अमरावती, अनुजा मनोजराव इरणकर (वय १७), यशोदानगर अमरावती, अतुल नामदेवराव इरणकर अमरावती, अरविंद रविंद्र चोपकर (वय १८) रा.भद्रावती चंद्रपूर, विमल विजय पाटील (वय २८) वडाळी अमरावती, आयुष श्रीराम लांजेवार (वय १२) आर्व्ही, रोहित ज्ञानदेव समर्थ (वय १०) तिवसा, ऋतुजा मनोज इरणकर (वय १४) अमरावती, कमलबाई मनोहरराव इरणकर (वय ५८), यशोदानगर अमरावती असे २५ जण जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
मात्र त्यापैकी विमल पाटील, अनिकेत चोपकर, राजकुमार बाळगुधे, सुधाकरराव अंबुलकर, सुमन अंकुलकर, मैनाबाई लांजेवार अशा ६ जणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना अकोला व बुलडाणा हलविण्यात आले आहे.