वर्षभरात २६0 प्रकरणं दाखल

By Admin | Published: November 8, 2016 02:16 AM2016-11-08T02:16:10+5:302016-11-08T02:16:10+5:30

वनक्षेत्रात वृक्षांची कत्तल सुरुच!

260 cases filed in the year | वर्षभरात २६0 प्रकरणं दाखल

वर्षभरात २६0 प्रकरणं दाखल

googlenewsNext

बुलडाणा, दि. ७- जिल्हा वन वैभवाने नटलेला असून ज्ञानगंगा, अंबाबरवासारखे अभयारण्य आणि लोणार येथील जागतिक ख्यातीचे लोणार सरोवर पर्यटकांना भुरळ घालतात. वन व वन्य प्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. मानवी अट्टाहासापायी वृक्षांची होणारी कत्तल आज मोठय़ा प्रमाणात सुरू असून, याप्रकरणी वर्षभरात २६0 गुन्हे दाखल झाले आहेत.
वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील वनवैभव गुद्मरु लागले आहे. लाकूड तस्करांची कुर्‍हाड मोल्यवान वृक्ष संपदा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. शेकडो वन औषध आणि विविध वन प्राण्यांसह पक्ष्यांच्या प्रजातींनी नटलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे वनवैभव टिकविण्याची मोठी जबाबदारी जिल्हावासीयांवर आली आहे. यात बुलडाणा वन परिक्षेत्रात गत एक वर्षात ३0७ वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची माहिती पुढे आली. जिल्ह्याला ८४0 चौरस कि.मीचे वनक्षेत्र लाभले असून, यात ७५५ चौ.कि.मी. राखीव व ७७.६५ चौ.कि.मी संरक्षित क्षेत्र आहे, तरी या वनराईवर अवैध वृक्षतोड करणार्‍यांची वक्रदृष्टी आहे. याबाबत वन विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्याचे ६.१0 टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात आले. वनक्षेत्रातील सागवन वृक्षाला लाकूड तस्करांनी प्रमुख लक्ष्य करून अनेक सागवृक्ष भुईसपाट केले.
दहा महिन्यात ५९ प्रकरणं
अवैध वृक्षतोड, प्राण्याची शिकार व अवैध वाहतूक तसेच वन जमिनीवर अतिक्रमण आदी घटना बुलडाणा वन क्षेत्रांमध्ये कमी झाल्याचे बोलले जात असताना, गत दहा महिन्यात या प्रकारातील ५९ प्रकरणं वन विभागाच्या दप्तरी नोंदविण्यात आले. यात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ५0 हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तर गत वर्षीचे ३४ प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत.

Web Title: 260 cases filed in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.