आधारभूत किंमतीने शेतमाल विक्रीसाठी २६२० शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 03:32 PM2018-10-13T15:32:56+5:302018-10-13T15:33:40+5:30
खामगाव: शासकीय किमान आधारभूत किंमतीने शेतमाल विक्री करण्यासाठी सध्या नोंदणी सुरू आहे. ११ आॅक्टोंबरपर्यंत खामगाव येथे २६२० शेतकºयांनी नोदणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शासकीय किमान आधारभूत किंमतीने शेतमाल विक्री करण्यासाठी सध्या नोंदणी सुरू आहे. त्यानुषंगाने खामगाव येथील खरेदीविक्री कार्यालयात शेतकºयांची गर्दी होत आहे. ११ आॅक्टोंबरपर्यंत खामगाव येथे २६२० शेतकºयांनी नोदणी केली.
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहीले. यामुळे जवळपास सर्वच पिके शेतकºयांच्या हातून गेल्यात जमा आहेत. पावसामुळे सोयाबीन, उडिद, मूगासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनास किमान भाव तरी चांगला मिळावा, या हेतून शेतकरी बांधव आधारभूत किंमतीने विक्रीसाठी शेतमालाची नोंदणी करीत आहेत. शेतकºयांनी शसकीय हमिदराने सोयाबीन, उडीद व मूगाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. खामगाव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेत ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत उडिदासाठी १५४९ शेतकºयांनी नोंदणी केली. मुगासाठी ५६९ तर सोयाबीनसाठी ५०२ शेतकºयांनी नोंदणी केली. एकूण २६२० शेतकºयांनी नोदणी केली आहे. हमीभावानूसार सोयाबीन ३३९९, उडिद ५६०० तर मुग ६९७५ रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे.
मोजकयाच शेतकºयांना होणार फायदा!
किमान आधारभूत किंमतीने शेतमाल विक्रीसाठी शेतकºयांकडून नोंदणी करण्यात येत असली, तरी याचा फायदा मोजक्याच शेतकºयांनाच होणार आहे. उडिद व मुग हे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाते. सदर पिक आल्यानंतर शेतकरी अडकलेले आर्थीक व्यवहार पार पाडतात. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी माल लगेचच विक्री करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी मालाची विक्री कमी भावात केलेली आहे. त्यामुळे फार कमी शेतकºयांच्या घरात शेतमाल शिल्लक आहे. परिणामी किमान आधारभूत किंमतीचा फायदा मोजक्याच शेतकºयांना होणार आहे.(प्रतिनिधी)