बुलडाणा तालुक्यात २७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:27+5:302021-05-31T04:25:27+5:30
जीर्ण वीजतारांवर महावितरणचा डोलारा सिंदखेडराजा : महावितरण कंपनीचा डोलारा जीर्ण विद्युततारांच्या भरवशावर उभा असून, विजेच्या समस्या वाढल्याने ...
जीर्ण वीजतारांवर महावितरणचा डोलारा
सिंदखेडराजा : महावितरण कंपनीचा डोलारा जीर्ण विद्युततारांच्या भरवशावर उभा असून, विजेच्या समस्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात रस्त्यालगतच्या वीजवाहिन्याही अनेक वर्षांपासून बदललेल्या नाहीत. त्यामुळे दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.
आंबे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर वाढला
मेहकर : भाजीपाला व फळे टवटवीत दिसण्यासाठी त्यावर अनेक घातक रसायनांचा वापर केला जात आहे. सध्या बाजारात पिवळे व टवटवीत दिसणारे आंबे विक्रीसाठी आले आहेत. परंतु आंबे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
पाणलोटची कामे थंडबस्त्यात
देऊळगावराजा : पाणलोट अभियानाची काही कामे निकृष्ट झाले आहेत, तर काही ठिकाणी पाणलोटची कामे थंडबस्त्यात आहेत. या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. परंतु कागदोपत्री चौकशी करून पुन्हा प्रश्न जैसे थे राहतो आहे.
अनियमित स्वच्छतेमुळे नाल्या तुंबल्या
सुलतानपूर : गावातील अनेक वाॅर्डांत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाल्या तुंबल्या असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. दुर्गंधी पसरली असून, आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जलव्यवस्थापन हाच पर्याय!
बुलडाणा : गत काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने खाली जात आहे. त्यामुळे येत्या काळात जमिनीत पाणी मुरविणे हाच एकमात्र पर्याय आहे. शोषखड्ड्यांच्या निर्मीतीतून जलव्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
वातावरणात थंडावा; उन्हापासून सुटका
मेहकर : गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान कमालीचे वाढले होते. तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला होता. दरम्यान, शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
शेतातील कामे आटोपण्याची घाई
बुलडाणा : शनिवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना शेतातील कामे आटोपण्याची घाई झाली आहे. शेतातील नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणे, बांधाची दुरुस्ती करणे, शेणखत नेऊन टाकणे अशा विविध कामांत शेतकरी गुंतून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. मान्सूनपूर्वी शेती मशागतीची कामे आटोपण्याची घाई सुरू आहे. बळीराजा शेती कामात अडकला आहे. यावर्षी चांगला पाऊस होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
गुटखाबंदी उरली फक्त कागदावरच
जानेफळ : कर्करोगास निमंत्रण ठरणाऱ्या गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे, मात्र ही बंदी आता केवळ कागदापुरतीच उरली असून, बंदीच्या काळात सर्वत्र गुटख्याची विक्री जोमात वाढलेली दिसून येत आहे. जानेफळसह परिसरात प्रत्येक खेड्यात किराणा दुकान, पानपट्टी आदी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत.
एटीएम बंद असल्याने ग्राहक त्रस्त
बुलडाणा : शहरातील काही एटीएम अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. एटीएम बंद बसल्याने त्यांना गैरसोय सहन करावी लागते. एटीएममधून पैसे मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे.
सार्वजनिक नळांना तोट्यांचा अभाव
बुलडाणा : शहरातील बऱ्याच वाॅर्डातील अनेक सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने नळाचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई असताना पाण्याची नासाडी काही ठिकाणी होते. त्यामुळे पाण्याचा हा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी नळांना तोट्या बसविण्याची गरज आहे.