२७७ ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडणार!
By Admin | Published: January 15, 2016 02:13 AM2016-01-15T02:13:50+5:302016-01-15T02:13:50+5:30
ई-पंचायत अंमलबजावणीस येणार गती; मार्चअखेर २१0 ग्रामपंचायतींचे काम होणार पूर्ण.
बुलडाणा: ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात २७७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंंत २१0 ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याने ह्या ग्रामपंचायती ऑनलाइन होणार आहेत. राज्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्चक्षमता व उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देऊन ई-पंचायत अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन व बीएसएनएल या तिघांमध्ये १२ एप्रिल २0१३ मध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम केला आहे. या योजनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरापर्यंंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. तसेच ग्रामीण नागरिकांनाही विविध सेवा सुविधा कमी श्रमात व कमी वेळात त्यांचे रहिवासी क्षेत्रात उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे. राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर आणि नांदुरा या चार तालुक्यातील २७७ ग्रामपंचा समावेश करण्यात आला आहे. सध्या या चारही तालुक्यात खोदकाम करून ऑप्टिकल फायबरचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. आतापर्यंंत १७0 ग्रामपंचायतींचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. तर मार्च अखेरपर्यंंत २१0 ग्रामपंचायतींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंंत बुलडाणा तालुक्यातील ६६, चिखली ९८, मलकापूर ४८ आणि नांदुरा तालुक्यातील ६५ अशा २७७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू झाली आहेत.