२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:34 AM2017-08-28T00:34:54+5:302017-08-28T00:35:10+5:30

संग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येते.

28 gram panchayatis are digitally vaccinated! | २८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

Next
ठळक मुद्देअनेक गावात शौचालयांचा वापर नाही गुडमॉर्निंग पथकाच्या स्थापनेकडे पं.स.चे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यात स्वच्छ भारत मिशन फक्त कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येते.
संग्रामपूर तालुका हा संपूर्ण हगणदरीमुक्त करण्यासाठी १५ सप्टेंबर २0१७ ही डेडलाइन आहे. तालुक्यात एकूण ५0 ग्रामपंचायती असून, त्यापैकी २८ ग्रामपंचायती या हगणदरीमुक्त झाल्याचा आकडा हा फक्त कागदोपत्री दाखविण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात करमोडा गाव वगळता इतर हगणदरीमुक्त घोषित झालेल्या बहुतांश गावामध्ये नागरिक हे उघड्यावरच शौचास बसताना दिसत आहेत. सद्यस्थितीत २२ ग्रामपंचायती या अद्यापही हगणदरीमुक्त झालेल्या नाहीत. तसेच या ग्रामपंचायती हगणदरीमुक्त व्हाव्या याकरिता पंचायत समितीने साधी गुडमॉर्निंग पथकाचीही स्थापना केलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी हे उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर कुठल्याही कारवाया करताना दिसून येत नसल्यामुळे व उघड्यावर शौचास बसणार्‍यांना गुडमॉर्निंग पथकाच्यावतीने कुठलीही समज दिली जात नसल्यामुळे कागदोपत्री हगणदरीमुक्त झालेल्या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिक हे उघड्यावरच शौचास बसत आहेत. त्यामुळे ही गावे हगणदरीमुक्त कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सन २0१२ च्या बेसलाइन सर्व्हेनुसार तालुक्यात एकूण २२ हजार ७0 एवढी कुटुंब संख्या होती. त्यापैकी ९ हजार ९७९ कुटुंबांकडे त्यावेळी बेसलाइन सर्व्हेनुसार शौचालये होती. तर शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १२ हजार ९१ एवढी होती. सन २0१३-१४ मध्ये १ हजार ६२, सन २0१४-१५ मध्ये १ हजार १९0, सन २0१५-१६ मध्ये १ हजार ५२४, सन २0१६-१७ मध्ये ३ हजार १६ तर २0१७ ते ऑगस्ट २0१७ पर्यंत १ हजार १४९ शौचालयाचे असे एकूण चार वर्षांमध्ये ७ हजार ९४१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण होऊन या शौचालयाचा वापर नागरिक करीत असल्याचा आकडा दाखविण्यात येत आहे. 
प्रत्यक्षात काही कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम तर केले; मात्र या शौचालयाचा वापर हे कुटुंब करीत नसल्यामुळे स्वच्छ भारत मिशनचा उद्देश सफल झालेला नाही. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या कुटुंबातील नागरिक आजही उघड्यावरच शौचास बसत आहेत. त्यामुळे गाव परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.                        

पंचायत समिती स्तरावर गुडमॉर्निंग पथकाची स्थापना झालेली नाही; मात्र ग्रामपंचायत स्तरावर पथक स्थापन झाल्यास त्यामध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शाखा अभियंता हे सहभागी होत असतात.
- डी.आर. हिरोळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, संग्रामपूर

Web Title: 28 gram panchayatis are digitally vaccinated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.