२८५ मुलांना मिळाले हरवलेले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:28+5:302021-06-29T04:23:28+5:30
बुलडाणा : एका महिन्यात घरून बेपत्ता झालेल्या जिल्ह्यातील अभिलेखावरील हरविलेले २६ व इतर २५६ अशा २८५ मुलांना ...
बुलडाणा : एका महिन्यात घरून बेपत्ता झालेल्या जिल्ह्यातील अभिलेखावरील हरविलेले २६ व इतर २५६ अशा २८५ मुलांना बुलडाणा पोलिसांनी शोधून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचून दिले आहे.
बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने व एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात दिनांक १ जून ते ३० जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे महिला पोलीस हवालदार गीता बामंदे, आताऊल्ला खान, नदीम शेख, गजानन चतुर तसेच महिला शाखेचे प्रभू परिहार, राजेश ठाकूर, कल्पना हिवाळे यांनी सदर मोहिमेत भाग घेऊन आतापर्यंत एकूण अभिलेखा वरील २९ व इतर २५६ अशा प्रकारे एकूण २८५ हरविलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले तसेच रस्त्यावर भीक मागणारे, निराधार , बेवारस फिरणारे असे एकूण २५६ लहान मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले़ तसेच त्यांना शिक्षणाबाबत व त्याची निगा राखण्याबाबत विनंती केली़ एकंदरीत दरवर्षी या मुस्कान पथकाचे प्रत्येक जिल्ह्यात पोलीस महासंचालक मुंबई यांच्या आदेशाने एक महिन्याची विशेष मोहीम राबविण्यात येते. मागील वर्षी सुद्धा बुलडाणा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात व पीआय बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात ही माेहीम राबवण्यात आली हाेती़ यावर्षी मागच्या पेक्षा टक्केवारीत जास्त उल्लेखनीय काम बुलडाणा पोलीस दलाने केले आहे़