बेपत्ता झालेल्या २८५ मुलांना मिळाले हरवलेले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:40 AM2021-06-29T11:40:03+5:302021-06-29T11:40:42+5:30
285 missing children get lost homes : २८५ मुलांना बुलडाणा पोलिसांनी शोधून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचून दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एका महिन्यात घरून बेपत्ता झालेल्या जिल्ह्यातील अभिलेखावरील हरविलेले २६ व इतर २५६ अशा २८५ मुलांना बुलडाणापोलिसांनी शोधून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचून दिले आहे.
बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने व एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात दिनांक १ जून ते ३० जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे महिला पोलीस हवालदार गीता बामंदे, आताऊल्ला खान, नदीम शेख, गजानन चतुर तसेच महिला शाखेचे प्रभू परिहार, राजेश ठाकूर, कल्पना हिवाळे यांनी सदर मोहिमेत भाग घेऊन आतापर्यंत एकूण अभिलेखा वरील २९ व इतर २५६ अशा प्रकारे एकूण २८५ हरविलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला हाेता. यावर्षीही जून महिन्या हा उपक्रम राबवण्यात आला.