जिल्ह्यात महिन्याकाठी ३ खून, ९ बलात्काराचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:49+5:302021-09-22T04:38:49+5:30
--अशी आहे गुन्हेगारीची आकडेवारी-- वर्ष ...
--अशी आहे गुन्हेगारीची आकडेवारी--
वर्ष खून बलात्कार विनयभंग
१ जाने ते ३१ ऑगस्ट २०२१ २७ ७४ २८६
१ जाने ते ३१ ऑगस्ट २०२० २६ ५४ २७८
तिहेरी खुनांनी हादरला होता जिल्हा
गेल्या वर्षी मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला होता. मायलेकीसह तिघींचा यात १५ ऑक्टोबर, २०२० दरम्यान झाला होता. कथित स्तरावरील अनैतिक संबंधातून हा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दादाराव अंबादार म्हैसागर (३८) यास अटक केली होती. या घटनेत मृत दोन मुली गर्भवती असल्याचे समोर आले होते. त्या संदर्भाने बोराखेडी पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डीएनए तपासणीसाठीही अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. नोव्हेंबर, २०२० दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी चालविली होती.
--अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये अत्याचार--
या वर्षी अल्पवयीन मेहुणीवर धावत्या कारमध्ये एकाने अत्याचार गेल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात २० ऑगस्ट रोजी घडली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसात दोन दिवसांनंतर तक्रार देण्यात आली होती. मात्र, २१ दिवसांनंतरही आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. चिखली पोलीस ठाण्यातप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.
--विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ--
जिल्ह्यात गतवर्षीच्या १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट आठ महिन्यांच्या कालावधीत २७८ विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत या वर्षीच्या आठ महिन्यांत २८६ घटना घडल्या आहेत. जवळपास ३ टक्क्यांनी विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.