आणखी ३० पाॅझिटिव्ह; २१ जणांची काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:32+5:302021-07-07T04:42:32+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी २१ जणांनी काेराेनावर मात केली, तसेच ३० जणांचा काेराेना अहवाल ...

30 more positive; 21 people defeated Kareena | आणखी ३० पाॅझिटिव्ह; २१ जणांची काेराेनावर मात

आणखी ३० पाॅझिटिव्ह; २१ जणांची काेराेनावर मात

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी २१ जणांनी काेराेनावर मात केली, तसेच ३० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच १२०५ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर ०२, लोणार तालुका भुमराळा १, जळगाव जामोद शहर ०१, शेगाव शहर ०१, खामगाव शहर ०५, नांदुरा शहर ०१, सि. राजा शहर ०१, चिखली तालुका बेराळा १७ आदींचा समावेश आहे, तसेच २१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे,

तसेच आजपर्यंत ५ लाख ८५ हजार ४७५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८६ हजार १५१ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. ९८७ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.

१५६ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात एकूण ८६ हजार ९७० कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८६ हजार १५१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात १५६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत ६६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: 30 more positive; 21 people defeated Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.