३00 वर्षांची परंपरा असलेला काठी महोत्सव

By admin | Published: February 7, 2017 02:56 AM2017-02-07T02:56:34+5:302017-02-07T02:56:34+5:30

धानोरा महासिद्ध; हजारो भाविकांची उपस्थिती

The 300-year-old Kathi Mahotsava | ३00 वर्षांची परंपरा असलेला काठी महोत्सव

३00 वर्षांची परंपरा असलेला काठी महोत्सव

Next

संदीप भोपळे
धानोरा महासिद्ध(बुलडाणा), दि. ६-जळगाव जामोद तालुक्यातील श्रीक्षेत्र धानोरा महासिद्ध येथे सोमवारी ३५0 वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक ह्यकाठीह्ण महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.
या उत्सवानिमित्त श्री क्षेत्र धानोरा येथे महासिद्ध महाराजांच्या जयघोषात काठी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ४0 फूट लांब असलेल्या बांबूच्या काठीला आसरा माता विहिरीमध्ये धुवून काठीचा नवीन रंगीत कापड व झेंडे बांधून तसेच मोरपिसांचा तुरा लावून पुष्प हाराने सुशोभित करण्यात आले. ५0 ते ६0 भक्तांनी सजविलेली काठी आपल्या खांद्यावरुन घेत दीपमाळेसमोर उभी करुन पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर धानोरा येथे महासिद्ध महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित पाच दिवसांच्या नवरात्रासदेखील सुरुवात झाली.

Web Title: The 300-year-old Kathi Mahotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.