जिल्ह्यात कोरोनाचे ३३१ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:29+5:302021-02-06T05:04:29+5:30
गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पळशी येथील २, पिंपळगाव राजा येथील १, खामगावातील ८, जळगाव जामोद १, चालठाणा १, हत्ता १, ...
गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पळशी येथील २, पिंपळगाव राजा येथील १, खामगावातील ८, जळगाव जामोद १, चालठाणा १, हत्ता १, देऊळगाव मही १, देऊळगाव राजा ४, चिखली ४, केळवद २, बेराळा २, लोणार २, मलकापूर पांग्रा १, साखरखेर्डा १, दाताळा १ आणि मलकापूरमधील चार जणांचा समावेश आहे.
दुसरीकडे ३७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना गुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधून १, चिखलीमधून १८, बुलडाणा १०, शेगाव ६, मोताळा १ तसेच देऊळगाव राजातील एकाचा समावेश आहे. यासोबतच तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी आतापर्यंत १,११,१३६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १३,६४८ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केलेली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १४,१४९ आहे. पैकी ३३१ रुग्ण हे सक्रिय आहेत.
१,१५५ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा
अद्यापही जिल्ह्यातील १,१५५ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३३१ आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १७० जणांचा मृत्यू झाला असून, कोरानाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.