राज्यस्तरीय मास्टर्स अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३४ खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 02:13 PM2017-11-13T14:13:19+5:302017-11-13T14:14:50+5:30
बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या. त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली.
बुलडाणा : जिल्हा मास्टर्स अॅथेलेटिक्स असोसिएशन द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मास्टर्स (प्रौढ) अॅथेलेटिक्स स्पर्धा १२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या. त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घााटन जिजामाता महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आत्माराम राठोड यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराटे प्रशिक्षक अंबूसकर हे होते. त्यांनी खेळाडूंना शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व आरोग्य अबाधित राखण्यासाठी याप्रकारच्या स्पर्धा प्रौढांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगून खेळ हा शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा एक महत्त्वाच मार्ग असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संतोष आंबेकर स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंना सर्वेतोपरी आर्थिक सहाय्य करण्याचे जाहीर केले.
संघटनेचे सचिव प्रा. डॉ. बाबाराव सांगळे व जी. एस. पवार यांनी मास्टर्स खेळाडुंची निवड चाचणी घेऊन राज्यपातळीवर निवड झालेल्या खेळाडुंची नावे जाहीर केली.
यामध्ये अतिश काकडे, मोहनसिंग तोमर, पंडीत यदमाळ, साहेबराव बोरकर, सुनील ठेंग, गणेश लहाने, सचिन जाधव, अमोल उगले, अविनाश तोडकरी, अरविंद तोडकरी, तुषार तायडे, सुधीर डहाके, सतिष भालेराव, शाहीद हुसैन, विनोद नितोणे, प्रसन्नजीत धंदर, अकिल खान, मो.इब्राहिम, आत्माराम चांदोरे, गजानन पवार इ. तसेच महिला खेळाडुंमध्ये रंजना जाधव, वैशाली चहाकर, कल्पना माने आणि राधा प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते. वरील मास्टर्स अॅथेलेटिक्स संघ वाशिम येथे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१७ दरम्यान होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष प्रा. संतोष आंबेकर यांनी दिली.