३५ हजार शेतक-यांपैकी १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे भरले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 08:09 PM2017-08-22T20:09:28+5:302017-08-22T20:13:07+5:30
मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात जवळपास ३५ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ १६६ शेतक-यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून, सरकारच्या जाचक अटीमुळे हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर तालुक्यात अलीकडच्या काळात पावसाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. दरवर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. विविध बँकांचा कर्जाचा बोजा शेतकºयांवर वाढतच आहे. सरकार कडूनही आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. भाजप सरकारने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. मात्र, सरकारने कर्जाचा अर्ज भरुन घेत असताना त्या अर्जामध्ये तब्बल ५६ अटी टाकल्या असून, बहुतांश अटी ह्या जाचक आहेत. कर्जमाफीचे अर्ज हे आॅनलाईन भरायचे आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मेहकर तालुक्यात १६१ ई-सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रापैकी केवळ ७ केंद्र सुरु आहेत. तर या केंद्रावर थम्ब मशिन नाहीत, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे शेतकºयांना अर्ज भरताना अडचणी येत आहेत. खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ आॅगस्ट रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर यांचे नेतृत्वात विभागप्रमुख राजु चव्हाण, प्रमोद काळे, अशोक बोरकर, गणेश शेवाळे, संदीप गायकवाड, उत्तम परमाळे, रोहीदास जाधव, अशोक पसरटे, सुपाजी जाधव, तसेच प्रत्येक शाखा प्रमुखाने मेहकर तालुक्यातील प्रत्येक ई-सेवा केंद्रावर जाऊन किती शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज भरले या संदर्भात माहिती घेतली असता जवळपास ३५ हजार शेतकºयांपैकी केवळ १६६ शेतकºयांनी कर्ज माफीचे अर्ज भरल्याचे आढळून आले. त्यामुळे सरकारच्या जाचक अटी, सुविधा नसणे, शेतकºयांमध्ये सरकार बद्दल रोष या सर्व गोष्टी पाहता सरकारची कर्जमाफीची घोषणा ही शेतकºयांची दिशाभुल करणारी व फसवी असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे.