किडनीच्या आजारामुळे ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By admin | Published: February 15, 2016 02:26 AM2016-02-15T02:26:33+5:302016-02-15T02:26:33+5:30
दोन वर्षांंपासून क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे किडनीच्या आजाराने ग्रासले होते.
संग्रामपूर: तालुक्यातील बोडखा येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेदरम्यान घडली. विजय शालीग्राम गवई असे मृतकाचे नाव असून, त्याला दोन वर्षांंपासून क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे किडनीच्या आजाराने ग्रासले होते. त्याच्यावर काही दिवसांपूर्वी जळगाव खान्देश येथेसुद्धा उपचार करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली; मात्र त्यांची परत गत एक महिन्यापूर्वी तब्येत खालावली. त्यामुळे शेगाव येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना १३ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी, आई, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. संग्रामपूर हा तालुका खारपाणपट्टय़ात येत असल्यामुळे तालुक्यात किडनीच्या आजाराने थैमान घातले असून, प्रत्येक गावामध्ये ४ ते ५ रुग्ण किडनीच्या आजाराने ग्रासले असून, तालुक्यात किडनीच्या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.