३५0 नागरिकांना बजावली नोटीस!

By admin | Published: March 15, 2016 02:15 AM2016-03-15T02:15:45+5:302016-03-15T02:15:45+5:30

खामगाव नगरपालिका प्रशासनाने थकीत कर वसूल करण्यासाठी कसली कंबर.

350 citizens issued notice! | ३५0 नागरिकांना बजावली नोटीस!

३५0 नागरिकांना बजावली नोटीस!

Next

खामगाव : शहरातील नागरिकांचा थकीत कर वसूल करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सरसावले असून, करवसुलीसाठी आतापर्यंंंत ३५0 नोटीस बजावण्यात आल्या आहेत. थकीत कर कुठल्याही परिस्थितीत वसूल झालाच पाहिजे आणि नगरपालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वर्ष २0१५-१६ या आर्थिक वर्षात खामगाव नगरपरिषदेने मालमत्ता कराचे संगणकीकृत मागणी देयके अंदाजे २६ हजार ५00 मालमत्ताधारकांना वितरित केलेले आहे. २0१५-१६ या आर्थिक वर्षात मालमत्ता करांचे व पाणीपट्टी कराचे एकूण उद्दिष्ट ८ कोटी ५५ लाख ७१ हजार रुपये आहे. त्या अनुषंगाने ८ मार्चपर्यंंत ३ कोटी ५५ लाख ३0 हजार रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. वसुलीची टक्केवारी ४२ टक्के एवढी आहे. उर्वरित करवसुली सोबतच उद्दिष्टपू र्तीसाठी उपाययोजना म्हणून नगरपालिका प्रशासनाने ३५0 नागरिकांना गेल्या १५ दिवसांत मालमत्ता जप्तीसोबतच नळतोडणीच्या नोटीस बजावल्या आहेत. वर्ष २0१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण ६ कोटी ३३ लाख वसूल करण्यात आले होते. वर्ष २0१५-१६ या वित्त वर्षामध्ये एकूण ७ कोटी नगरपालिका कराची वसूल होण्याची शक्यता आहे. ९0 टक्के वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याकरिता कर विभागातील कर्मचार्‍यांनी कंबर कसली आहे. एकूण ३0 कर्मचारी जानेवारीपासून कोणत्याही प्रकारच्या शासकीय सुटीचा लाभ न घेता मेहनत घेत आहेत. नागरिकांनीदेखील नगरपालिकेच्या वसुली मोहिमेला सहकार्य करीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर स्वयंस्फूर्तीने भरला. कार्यालयीन दिवशी तसेच सुटीच्या दिवशी येऊनदेखील नागरिकांनी कर भरला. कर भरताना नागरिकांच्या काही किरकोळ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारी कर विभागामार्फत वेळीच निकाली काढण्यात आल्या. कर वसुलीचे काम युद्धपातळीवर सुरु असले तरी अद्यापही काही नागरिकांनी कर भरलेला नाही. अशा ३५0 नागरिकांना नगर पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

Web Title: 350 citizens issued notice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.