सैलानी यात्रा महोत्सवासाठी ३५० यात्रा स्पेशल बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:26 PM2020-02-10T16:26:47+5:302020-02-10T16:27:21+5:30

राज्यासह देशातून सुमारे आठ लाख भाविक महिनाभर चालणाºया या यात्रा महोत्सवात येतात.

350 Travel Special bus for Sailani Yatra | सैलानी यात्रा महोत्सवासाठी ३५० यात्रा स्पेशल बसगाड्या

सैलानी यात्रा महोत्सवासाठी ३५० यात्रा स्पेशल बसगाड्या

googlenewsNext

- विठ्ठल सोनुने  
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सराई : भाविकांच्या आस्था व श्रद्धेच्या कसोटीवर उतरणाऱ्या सैलानी यात्रा महोत्सवासाठी राज्यातील सहा आगारातून ३४० बसगाड्या सोडण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ होत आहे. राज्यासह देशातून सुमारे आठ लाख भाविक महिनाभर चालणाºया या यात्रा महोत्सवात येतात. ग्रामीण अर्थचक्रासह जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वपूर्ण योगदान देते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.
त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातर्फे वतीने प्रवासांच्या सुविधेसोबतच उत्पन्न वाढीच्या दृष्टीे प्रयत्न करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तहसिल कार्यालयात सैलानी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारी बाबत बैठक पार पडली. त्यात राज्यभरातून जवळपास ३५० यात्रा स्पेशन बसगाड्या सोडल्या जावू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. साधारणत: दरवर्षी या संख्ये दरम्यानच बसगाड्यांच्या फेºया सैलानी यात्रेदरम्यान होत असतात. तसेच नियोजन यावर्षीही करण्यात येणार आहे.
बुलडाणा विभागातून दररोज ८०, औरंगाबाद विभागातून दररोज ६०, अकोला विभागातून ६०, यवतमाळ विभागातून ४०, जालना आगारातून ६० आणि अमरावती आगारातून ४० बसेस सोडण्याचे संभाव्य नियोजन आहे. या यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून राज्य पहिवहन महामंडळा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यादृष्टीने सध्या नियोजन सुरू आहे.
सैलानीत देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. यावर्षी परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे.

Web Title: 350 Travel Special bus for Sailani Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.