वृक्ष लागवडीसाठी ३६ प्रशासकीय यंत्रणा सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:31 PM2018-06-09T18:31:41+5:302018-06-09T18:31:41+5:30
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. यावर्षी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य ३६ प्रशासकीय यंत्रणा सरसावल्या आहेत.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. यावर्षी मोहिमेच्या दुसºया टप्प्यात बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या मुख्य ३६ प्रशासकीय यंत्रणा सरसावल्या आहेत. या मोहिमेअंतर्गंत जास्तीत जास्त झाडे जिवंत राहतील, या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याच्या सूचना मोहिमेत सहभागी प्रशासकीय यंत्रणांना वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे दरवर्षी कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी शासन विविध योजनेंतर्गत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देते. विविध योजनांच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन देते. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गंत २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गंत बुलडाणा जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर मोहिमेच्या दुसºया टप्प्यात १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गंत बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मध्ये सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींना ९ लाख ४८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानंतर वनविभागाला ४ लाख, सामाजिक वनिकरण ६ लाख व इतर विभागाला ४ लाख २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ३६ प्रशासकीय यंत्रणेला २३ लाख ७३ हजार हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी १ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान होणार असल्यामुळे या दृष्टीकोनातून प्रत्येक मोहिमेत सहभागी प्रत्येक प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
मोहिमेत या ३६ प्रशासकीय यंत्रणांचा सहभाग
बुलडाणा जिल्ह्यात होणाºया वृक्षलागवडीमध्ये प्रशासनाच्या एकूण ३६ यंत्रणा सहभागी होणार आहेत. त्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, जिल्ह्यातील ग्रामपंचायती, कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव, कार्यकारी अभियंता बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग अकोला, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, बुलडाणा., जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा., जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा., अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, बुलडाणा., सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशाासन, बुलडाणा., अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलडाणा., अधिक्षक, मध्यवर्ती कारागृह विभाग, बुलडाणा., राज्य परिवहन विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालय, बुलडाणा., जिल्हा परिषद सिंचन विभाग, बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महसूल विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा कोषागार अधिकारी, डाकघर अधिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, भुजल व सर्वेक्षण विकास यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला या यंत्रणांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १ ते ३१ जुलै दरम्यान जवळपास ३६ प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, नागरिक व वृक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होवून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करावी.
- बी.टी.भगत, उपवनसंरक्षक, वनविभाग, बुलडाणा.