३६ बीएएमएस डाॅक्टर केले कार्यमुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:24+5:302021-06-30T04:22:24+5:30
सिंदखेड राजा तालुक्यात तुरीचे क्षेत्र वाढणार सिंदखेडराजा : कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत या वर्षी तालुक्यात तुरीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला ...
सिंदखेड राजा तालुक्यात तुरीचे क्षेत्र वाढणार
सिंदखेडराजा : कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत या वर्षी तालुक्यात तुरीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे. या वर्षी कपाशी लागवडीत कमी येऊन कडधान्यांचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना वीज बिलाची सक्ती करू नये
बुलडाणा : मागील वर्षी रब्बी हंगामात पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यात कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी वीज बिल भरू शकले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना वीज बिलाची सक्ती करू नये, अशी मागणी होत आहे.
ऑटाेचालकांना सरसकट मदत द्या!
बुलडाणा : आर्थिक संकटात सापडलेल्या ऑटो चालकांना कोणतीही अट न लावता सरसकट ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, अशा सर्वच चालकांना पंधराशे रुपये शासकीय मदत योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी हाेत आहे.
काेराेनामुळे अनेकांचा मानसिक ताण वाढला
बुलडाणा : गत वर्षभरापासून जिल्ह्यात काेराेनाने थैमान घातले आहे. काेराेना राेखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून, बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच मानसिक ताण वाढत आहे.
रेनवॉटर हार्व्हेस्टिंग राबविण्याची मागणी
बुलडाणा : पाणीटंचाईचा सामना करताना भूजलाचा उपसा करण्याऐवजी पाणीटंचाई नसताना भूजलाची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक मालमत्तेवर रेनवॉटर हार्व्हेस्टिंग योजना राबविणे महत्त्वाचे आहे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.
मायक्रो फायनान्सची वसुली थांबवा
सुलतानपूर : लॉकडाऊनमध्येही मायक्रो फायनान्सची वसुली जोमात सुरूच आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न कर्ज घेणाऱ्यांना पडला आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
साेयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा?
धाड : परिसरात गत काही दिवसांपासून साेयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच सहा महिन्यांपासून कृषी अधिकारी व कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाशिवायच शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार आहे.
काेराेनाकाळात पुरुषांचाही छळ; २१ तक्रारी
बुलडाणा : काेरोनामुळे अनेकांचे राेजगार गेले. त्यामुळे, आर्थिक संकटामुळे काैटुंबिक कलह वाढत आहेत. भराेसा सेलमध्ये जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी २१ तक्रारी पुरुषांनी दाखल केल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात लाॅकडाऊनमुळे कुटुंबात वाद झाल्याची तुरळक प्रकरणे आहेत.
शेतकरी फळबाग याेजनेपासून वंचित
सुलतानपूर : गेल्या दोन वर्षांपासून केवळ लोणार पंचायत समितीच्या चालढकल कारभारामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत़
बँकेत येणाऱ्यांची काेविड चाचणी करावी
डोणगाव : काेराेनाची दुसरी लाट ओसरल्याने बँकांमध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे़ नागरिक काेराेनाविषयक नियमांचे पालन करीत नसल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे़ त्यामुळे बँकांमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची काेविड चाचणी करण्याची मागणी हाेत आहे.
गाेहाेगाव दांदडे येथे आराेग्य तपासणी शिबिर
गोहोगाव दांदडे : आयुष्यमान भारत याेजनेंतर्गत गाेहोगाव दांदडे येथील प्राथमिक आराेग्य उपकेंद्रामध्ये ग्रामस्थांची आराेग्य तपासणी करण्यात आली.
भारत सरकारच्या वतीने ‘आयुष्यमान भारत’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही तपासणी करण्यात आली़
पाेलीस पाटलांच्या मागण्यांवर निर्णय घ्या
मोताळा : महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या प्रलंबित सर्व मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले आहेत़.