आणखी ३६ ‘पॉझिटिव्ह’; १०८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:31 PM2020-12-06T12:31:20+5:302020-12-06T12:31:37+5:30

Buldhana CoronaVirus News एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११,४९२ झाला आहे.

36 more 'positive'; 108 patients overcome corona | आणखी ३६ ‘पॉझिटिव्ह’; १०८ रुग्णांची कोरोनावर मात

आणखी ३६ ‘पॉझिटिव्ह’; १०८ रुग्णांची कोरोनावर मात

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी ४१५ जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३७९ अहवाल निगेटिव्ह आले तर ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११,४९२ झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत ११,०५५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा सहा, नांदुरा एक, सावखेड तेजन दोन, साखरखेर्डा एक, अकोला देव दोन, मलकापूर एक, सुनगाव जहागीर एक, शेगाव दोन, पिंप्री गवळी सहा, बोराखेडी एक, खामगाव एक, गणेशपूर दोन, देऊळगाव राजा एक, सुलतानपूर एक, मेहकर एक, पारखेड एक, बोरखेड धाड एक, वरखेडमधील पाच जणांचा समावेश आहे.  शनिवारी १०८ जणांनी कोरोनावर मात केली.  ७७ हजार ६६८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले.

Web Title: 36 more 'positive'; 108 patients overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.