बुलडाणा जि.प.च्या ३६७ शाळांच्या पटसंख्येत झपाट्याने घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:50 AM2018-04-18T01:50:43+5:302018-04-18T01:50:43+5:30

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे.

367 schools in Buldhana district fall sharply! | बुलडाणा जि.प.च्या ३६७ शाळांच्या पटसंख्येत झपाट्याने घट!

बुलडाणा जि.प.च्या ३६७ शाळांच्या पटसंख्येत झपाट्याने घट!

Next
ठळक मुद्देदोन वर्षात आठ हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर अहवालात आली माहिती समोर

नीलेश जोशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे.
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुलडाण्यात ७ एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या कमी होण्यासंदर्भातील अहवालावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली.
प्रामुख्याने जिल्ह्यातील १४४९ शाळांपैकी या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. २0१५-१६, २0१६-१७ आणि २0१७-१८ या शैक्षणिक वर्षातील या शाळांच्या पटसंख्येचा विचार करता ही बाब स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २0 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ही जवळपास २६४ आहे. 
शून्य ते दहा पटसंख्येच्या जिल्ह्यात ९ शाळा आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत उपरोक्त ३६७ शाळांची पटसंख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. २0१५-१६ मध्ये या शाळांमध्ये ५२ हजार ६७0 विद्यार्थी शिकत होते तर २0१६-१७ मध्ये या शाळांमधील चार हजार २१७ विद्यार्थी खासगी शाळांमध्ये स्थलांतरीत होऊन या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ही ४८ हजार ४५३ इतकीच राहिली.
 दरम्यान, २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात पुन्हा या विद्यार्थी संख्येतून चार हजार १४२ विद्यार्थी अन्य शाळांमध्ये स्थलांतरीत झाल्याने या ३६७ शाळांमध्ये ४४ हजार ३११ विद्यार्थी संख्या उरली आहे.   यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र डिजिटल
एकीकडे तीन वर्षात जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळांमधून आठ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी अन्यत्र स्थलांतरीत झाले आहे तर  दुसरीकडे जिल्ह्यातील ९0६ शाळा या डिजिटल झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ई-लर्निंगची सुविधा जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याने ग्राम पातळीवरील विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे वाढत असल्याचा दावा शिक्षण विभागातील सूत्रांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी केला.

पटसंख्या टिकविण्यासाठी प्रयत्न
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्यासाठी प्रशासनाने सुधारणांची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग हा उपरोक्त डिजिटल शाळा, सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करणे, ई-लर्निंग सुविधा पुरविणे आहे. त्यामध्ये जिल्हा प्रशासन बर्‍यापैकी यशस्वी झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: 367 schools in Buldhana district fall sharply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.