खंडित कालावधीतील ३७ कुटुंबांना अपघात विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:34+5:302021-08-23T04:36:34+5:30

अंढेरा : विमा कंपनीची मुदत संपल्याने खंडित कालावधी असलेल्या डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या चार महिन्यात अपघाती मृत्यू ...

37 families waiting for accident insurance | खंडित कालावधीतील ३७ कुटुंबांना अपघात विम्याची प्रतीक्षा

खंडित कालावधीतील ३७ कुटुंबांना अपघात विम्याची प्रतीक्षा

Next

अंढेरा : विमा कंपनीची मुदत संपल्याने खंडित कालावधी असलेल्या डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या चार महिन्यात अपघाती मृत्यू झालेल्या ३७ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़

शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्य यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाकडून मदत म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत मदत करण्यात येते. ही याेजना राबविणाऱ्या कंपनीची मुदत संपल्यानंतर नवीन कंपनीची नियुक्ती किंवा जुन्या कंपनीला मुदतवाढ देण्यास शासनाकडून विलंब झाला़ त्यामुळे, १० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१ या चार महिन्यांच्या काल खंडातील कंपनीची नियुक्ती नसल्याने व जुन्या कंपनीचा करार संपल्याने नवीन कंपनी नियुक्तमधील हा कालावधी खंडित म्हणून गणल्या जात आहे. या काळात बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ३७ शेतकरी असून त्यात २० पूर्वसूचना तर १७ प्रस्ताव कृषिविभाग यांच्याकडे प्राप्त आहे़ या ३७ कुटुंबांना अद्यापही मदत मिळाली नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़

अशी आहेत प्रलंबित प्रकरणे

अपघात विमा योजनेसाठी खंडित कालावधीतील प्रस्तावांमध्ये बुलडाणा तालुक्यातील २, चिखली तालुक्यातील ५, मलकापूर मधील २, खामगाव मधील २,शेगाव मधील १, नांदुरा मधील ४, जळगाव जामोद मधील १, संग्रामपूरमधील १, मेहकरमधील १, लोणारमधील ८, देऊळगाव राजा तालुक्यातील ३, तर सिंदखेडराजा तालुक्यातील ७ अशा एकूण ३७ शेतकरी कुटुंबांच्या प्रकरणाचा समावेश आहे़

काेट

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील सर्व प्रस्तावांना शासन स्तरावर लवकरच मंजुरात देण्यात येऊन लाभ देण्यात येईल!

दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

खंडित कालावधीतील प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येऊन मंजुरी मिळाल्यास त्या कालावधीतील शेतकरी कुटुंबाना लाभ देण्यात येईल.

शंकर टोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

Web Title: 37 families waiting for accident insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.