महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला ३७२0 परीक्षार्थी
By admin | Published: March 10, 2017 01:47 AM2017-03-10T01:47:28+5:302017-03-10T01:47:28+5:30
१२ मार्चला होणार परीक्षा; बुल १२ परीक्षा केंद्रांवर परीक्षाचे नियोजन
बुलडाणा, दि. ९- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा रविवार, १२ मार्च २0१७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी १0.३0 त १२ वाजेदरम्यान होणार असून, या परीक्षेला जिल्ह्यातून ३७२0 उमेदवार बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील १२ परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा २0१६ ही १२ मार्च २0१७ रोजी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३७२0 परीक्षार्थी बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील १२ परीक्षा केंद्रांवर नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात ५७६ परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३६0, सहकार विद्यामंदिर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात ३३६, रामभाऊ लिंगाडे पॉलिटेक्निक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात ३१२, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात २४0, सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूल भादोला परीक्षा केंद्रात २४0, उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जोहर नगर बुलडाणा परीक्षा केंद्रात २४0, राजर्षी शाहू पॉलिटेक्निक शाहू नगर सागवण येथे २८८ परीक्षार्थी, पंकज लद्धड महाविद्यालय चिखली रोड येथे ३१२, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात २४0 परीक्षार्थी व प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर परीक्षा केंद्रात २४0 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहेत.