जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ३८ शाळा पात्र

By admin | Published: September 28, 2016 01:15 AM2016-09-28T01:15:18+5:302016-09-28T01:15:18+5:30

बुलडाणा जिल्ह्यातून अंतिम नोंदणी केलेल्या ७८७ शाळांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरल्याची माहिती.

38 School eligible for district level award | जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ३८ शाळा पात्र

जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ३८ शाळा पात्र

Next

गणेश मापारी
खामगाव(जि. बुलडाणा), दि. २७- स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेसाठी बुलडाणा जिल्ह्यातून अंतिम नोंदणी केलेल्या ७८७ शाळांपैकी जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागृकता निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारी शाळा, समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणारी शाळा तसेच आरोग्य व स्वच्छतेबाबत इतरांना प्रेरणा देणार्‍या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
स्वच्छता गृह, साबणाने हात धुणे, पाण्याची व्यवस्था, ऑपरेशन अँण्ड मेन्टनन्स आणि स्वच्छतेच्या सवयींची रुजवणूक यासाठी एकूण १00 गुण शाळा, विद्यालयांना देण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध रंगानुसार शाळांचे गट तयार करण्यात आले आहेत.
३५ पेक्षा कमी गुण घेणार्‍या शाळांसाठी ह्यरेडह्ण गट असून, ३५ ते ५0 ह्यऑरेंजह्ण, ५१ ते ७४ ह्ययलोह्ण, ७५ ते ८९ ह्यब्ल्यूह्ण आणि ९0 ते १00 गुण मिळविणार्‍या शाळा ह्यग्रीनह्ण गटात टाकण्यात येणार आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक होते. बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या १ हजार ४५७ शाळांपैकी १ हजार १८३ शाळांनी नोंदणी केली होती; मात्र शाळांची सविस्तर माहिती देण्याच्या प्रक्रियेत ३८३ शाळा बाद झाल्या आहेत.
त्यामुळे या स्पर्धेत जिल्हाभरातून केवळ ७८७ शाळाच राहिल्या. या ७८७ शाळांची तपासणी निरीक्षण समितीने केली असून, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी केवळ ३८ शाळा पात्र ठरलेल्या आहेत. या ३८ शाळांपैकीही तीन शाळांनी काही निकषांची पूर्तता करणे अद्याप बाकी आहे.

१७२ शाळा विषयनिहाय पुरस्कारासाठी पात्र
स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांसोबतच प्रत्येक मुद्यांवर चांगली कामगिरी करणार्‍या शाळांनाही पुरस्कार देण्यात येणार आहे. पाणी उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, विद्यार्थी वर्तवणूक बदल आणि वेगवेगळे शौचालय या मुद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानुसार वेगवेगळ्या विषयांवर चांगले काम करणार्‍या जिल्ह्यातील १७२ शाळा विषयनिहाय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत.

आलेख घसरताच
स्वच्छ विद्यालय पुरस्कारामध्ये जिल्ह्यातील शाळांच्या सहभागाचा आलेख घसरताच असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५६३ शाळांपैकी १ हजार १७0 शाळांनी सर्वप्रथम ऑनलाइन नामांकन भरले. अंतिम नामांकनाच्या वेळी यामधील ३८३ शाळा कमी झाल्या. त्यामुळे ७८७ शाळांचाच सहभाग या अभियानामध्ये राहिला. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी आता केवळ ३८ शाळा पात्र झाल्या आहेत. यापैकीही काही शाळांची गळती होणार असून, राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किती शाळा अंतिम यादीत राहतील, याकडेच आता लक्ष लागले आहे.

Web Title: 38 School eligible for district level award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.