धरण क्षेत्रातील ३८ गावांना धोका!

By admin | Published: July 7, 2016 02:45 AM2016-07-07T02:45:16+5:302016-07-07T02:45:16+5:30

आपत्ती विभागाचा अहवालानुसार बुलडाणा जिल्ह्यातील २६0 प्रकल्पामुळे २३४ गावे प्रभावित होण्याची शक्यता.

38 villages in danger zone risk! | धरण क्षेत्रातील ३८ गावांना धोका!

धरण क्षेत्रातील ३८ गावांना धोका!

Next

बुलडाणा : अतवृष्टीमुळे धरणांची पातळी वाढून धरणामुळे जिल्ह्यातील धरणाखालील व धरणाजवळील गावांना धोका संभवून मोठय़ा प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती विभागाने २0१६ आपत्ती व्यवस्थापन अहवाल तयार केला असून, त्यानुसार धरण फुटल्यास धोका उद्भवणार्‍या ३८ गावांत सतर्कता ठेवण्यात आली आहे.
पावसाला सुरुवात झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावे ही संभाव्य पूरबाधित आणि ३८ गावे धरणापासून संभाव्य धोका असणारी म्हणून निवडण्यात आली आहेत. त्यामुळे पुराच्या संभाव्य धोक्यामुळे या गावांमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक प्रभावित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना केल्या आहेत.
जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प, सहा मध्यम प्रकल्प, ७६ लघू प्रकल्प आणि १७६ पाझर तलाव आहेत. २६0 एकूण प्रकल्प असून, जिल्ह्यातील मुख्य शहरांसह २३४ गावं व परिसरात पाणीपुरवठा व सिंचनाची सोय असलेले प्रकल्प होत. मात्र नागरिकांसाठी व पिकांसाठी जीवनदान देणारे हे प्रकल्प अतवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

Web Title: 38 villages in danger zone risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.