बुलडाणा जिल्ह्यातील ३९३ पाणी नमुने तपासणीत निघाले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 12:14 PM2021-08-19T12:14:59+5:302021-08-19T12:15:18+5:30

393 water samples tested in Buldana district contaminated : नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडरविनाच करण्यात येताे.

393 water samples tested in Buldana district contaminated | बुलडाणा जिल्ह्यातील ३९३ पाणी नमुने तपासणीत निघाले दूषित

बुलडाणा जिल्ह्यातील ३९३ पाणी नमुने तपासणीत निघाले दूषित

Next

- भगवान वानखेडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या अणूजैविक तपासणीत १३ ही तालुक्यात पाण्याचे  ३९३ दुषीत नमुने आढळून आले आहेत. 
जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडरविनाच करण्यात येताे. पावसाळ्याच्या दिवसात तर नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा उपयाेग करणे आवश्यक असते. तो होत नसल्याने नमुने दुषीत येत आहेत.


पाण्याचे नमुने दूषित आढळल्यानंतर संबंधित गावांना कळविण्यात आले आहे. त्या दूषित पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जणेकरून जलजन्य आजार डोके वर काढणार नाहीत. 
- विश्वास वालदे, 
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, बुलडाणा.

Web Title: 393 water samples tested in Buldana district contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.