४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू

By ब्रह्मानंद जाधव | Published: August 27, 2023 05:42 PM2023-08-27T17:42:32+5:302023-08-27T17:42:51+5:30

पशुपालकांनाे सावधान, लम्पी पुन्हा वाढतोय!

40 percent cattle affected by lumpy two cattle died buldhana | ४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू

४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण, दोन गुरांचा मृत्यू

googlenewsNext

मेहकर : पशुपालकांनो सावधान, लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४० टक्क्यांवर गुरांना लम्पीची लागण झाली आहे. तालुक्यातील गोहोगाव दांदडे व खंडाळा येथे दोन गुरांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.

गतवर्षी लम्पीने पशुपालक हैराण झाले होते. लम्पी आजाराने अनेक गुरांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात सर्वाधीक लम्पीबाधीत गुरांची संख्या मेहकर तालुक्यात आढळून आली होती. आता पुन्हा तालुक्यात लम्पीने शिरकाव केला आहे. प्रत्येक गावात लम्पीग्रस्त गुरे आढळून येत आहेत. तालुक्यात गोवर्गीय गुरांची संख्या ४६ हजार आहे. त्यापैकी ३५ ते ४० टक्के गुरांना लम्पीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे पशुपालकांची चिंता वाढली असून, शासकीय वैद्यकीय सेवाही अपूरी पडत आहे. अनेकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे.

४५ हजार २४० गुरांचे लसीकरण
मेहकर तालुक्यातील एकूण ४६ हजार गोवर्गीय गुरांपैकी ४५ हजार २४० गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लम्पीबाधीत गुरांमुळे पशुपालकही आपल्या गुरांच्या लसीकरणासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून गावागावात गुरांच्या लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

२९ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
मेहकर तालुक्यात पशुवैकीय विभागाता केवळ २९ कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे पुशपालकांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. अनेक वेळा तर गुरांच्या तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारीच खासगी डॉक्टारांना पाठवत असल्याचे दिसून येते.

गुरांच्या मृत्यूने वाढली धास्ती
मेहकर तालुक्यातील गोहोगाव दांदडे येथे एक आणि खंडाळा येथे रतन मानघाले यांच्या मालकीच्या एका गुराचा लम्पीने मृत्यू झाला आहे. लम्पीने गुरांचा मृत्यू होण्याला सुरूवात झाल्याने पशुपालकांमध्ये आता धास्ती वाढली आहे.

काय म्हणतात पशुसंवर्धन अधिकारी..
मेहकर तालुक्यात लम्पीची लागन झाल्याचे अनेक गुरे आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. तसेच तालुक्यातील गुरांच्या लसीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. अनेक गावातील लसीकरण आता पूर्ण झाले आहे.
आनंद आसवार,
पशुसंवर्धन अधिकारी, मेहकर.

Web Title: 40 percent cattle affected by lumpy two cattle died buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.