नांदुरा येथे ४0 हजाराचा डिंक जप्त
By admin | Published: July 22, 2014 11:41 PM2014-07-22T23:41:29+5:302014-07-22T23:41:29+5:30
नांदुरा पोलिसांनी ४0 हजार रूपये किंमतीचा १४२.५00 किलो डिंक जप्त केला.
नांदुरा : अवैधरित्या डिंक घेवून जात असलेल्या जामोद येथील एकास नांदुरा पोलिसांनी पकडून त्याचेजवळून ४0 हजार रूपये किंमतीचा १४२.५00 किलो डिंक जप्त केला. सदर घटना काल नांदुरा बसस्थानकावर घडली. पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वन अधिकार्यांना बोलावून सदर आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. जामोद, ता.जळगाव जा. येथील शेख हमजा शेख रऊफ हा संशयास्पद रित्या नांदुरा बसस्थानकावर उभा असल्याची माहिती नांदुरा पोलिस स्टेशनचे गजानन वाघमारे, पोकाँ डामरे यांना मिळाली होती. या माहितीनंतर उपरोक्त दोघांनी नांदुरा बसस्थानकावर धाव घेवून शेख हमजा शेख रऊफ यास पकडून त्याचे जवळ असलेल्या ५ बॅगची तपासणी केली असता त्यात डिंक मिळून आला. या डिंकाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून सदर घटनेबाबत जळगाव जामोद वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाचे पीएसआय चौधरी हे आपल्या कर्मचार्यांसह नांदुरा येथे येवून त्यांनी आरोपीस अटक करून त्यांचेकडील १४२ किलो ५00 ग्रॅम डिंक किंमत ४0 हजार रूपये जप्त केला. तसेच याप्रकरणी वन कायद्याअंतर्गत २३८/२२ गुन्ह्याची नोंद केली.