४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकल स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याची महिला भारतातून दुसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:38 PM2018-01-23T13:38:07+5:302018-01-23T13:40:04+5:30

हिवरा आश्रम (बुलडाणा) : वाशिम राँदिनियर्स या ग्रुप ने आयोजित केलेली वाशिम ते अमरावती मार्गावर ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत देऊळगाव माळी येथील अलका गिऱ्हे या महिलेने मध्य भारतातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.

In the 400-kilometer brave cycle competition, the lady from Buldhana district is second from India | ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकल स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याची महिला भारतातून दुसरी

४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकल स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याची महिला भारतातून दुसरी

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम राँदिनियर्स या ग्रुप ने आयोजित केलेली वाशिम ते अमरावती मार्गावर ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत देऊळगाव माळी येथील अलका गिऱ्हे या महिलेने मध्य भारतातून द्वितीय.वाशिम-मालेगाव-अमरावती मार्गे तळेगाव २०० किलोमीटर जाणे व परत त्याच मार्गाने येणे असा ४०० किलोमीटरचा प्रवास २७ तासांमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान या स्पर्धेत ठेवण्यात आले होते. अलका गिऱ्हे  हिने २६ तास ५० मिनिट वेळामध्ये ४०० किलो मिटरचे अंतर पूर्ण करून मध्य भारतामधून दुसरी महिला ठरली आहे.

हिवरा आश्रम (बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्याला राष्ट्रमाता जिजाऊंच्या रुपाने ऐतिहासीक वारसा लाभला आहे. मॉ जिजाऊंचा आदर्श घेवून जिल्ह्यातील महिला आज अनेक यश प्राप्त करत आहेत. त्याचाच प्रत्यय मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे आला. वाशिम राँदिनियर्स या ग्रुप ने आयोजित केलेली वाशिम ते अमरावती मार्गावर ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत देऊळगाव माळी येथील अलका गिऱ्हे या महिलेने मध्य भारतातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. यापूर्वी नागपूरच्या जोती पटेलने हा बहुमान मिळवला होता. वाशिममध्ये झालेल्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेमध्ये सात सायकल पट्टूने सहभाग घेतला होता. सायकलने वाशिम-मालेगाव-अमरावती मार्गे तळेगाव २०० किलोमीटर जाणे व परत त्याच मार्गाने येणे असा ४०० किलोमीटरचा प्रवास २७ तासांमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान या स्पर्धेत ठेवण्यात आले होते. अनेक महिलांनी या स्पर्धेसाठी कसोशीने प्रयत्न केले असता, हे आव्हान पूर्ण करणाºयास बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी येथील अल्का गिऱ्हे  ही महिला समर्थ ठरल्याचे दिसून आले. अलका गिऱ्हे  हिने २६ तास ५० मिनिट वेळामध्ये ४०० किलो मिटरचे अंतर पूर्ण करून मध्य भारतामधून दुसरी महिला ठरली आहे. ब्रेवेट ही स्पर्धा म्हणून नवे तर स्वत: ला साध्य करणाचे आव्हान सायकल पटूंना असते, वेळेत स्पर्धा पूर्ण करणारे सर्व सायकलस्वार विजयी ठरतात. स्वत:ला साध्य करणे हेच या स्पर्धेचे महत्त्व आहे. महिला यामध्ये सहभाग घेऊन त्या कुठे ही कमी नाही हा संदेश अलका गिर्हे हिने दिला आहे. वाशिमकराच्या वतीने तिचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. अलकाने आपल्या यशाचे श्रेय पती डॉ गजानन गिऱ्हे, सासरे जयराम गिऱ्हे, सासु कमल गिऱ्हे , वडिल लक्ष्मणराव इंगोले, लताबाई इंगोले, डॉ. विजय गिऱ्हे , डॉ.प्राची गिऱ्हे  व तिचे प्रशिक्षक नारायण व्यास, बंधु शंकर व अमोल मुले, ओम व श्रध्दा यांना दिले.

Web Title: In the 400-kilometer brave cycle competition, the lady from Buldhana district is second from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.