४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह;१६ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:18 AM2020-07-29T11:18:42+5:302020-07-29T11:18:53+5:30
जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा एक हजार १०१ वर पोहोचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुधवारी जिल्ह्यास प्राप्त झालेल्या ३२९ अहवालांपैकी ४१ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे तर २८६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा एक हजार १०१ वर पोहोचला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत ही बाब समोर आली. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोग शाळेतील तपासणीमध्ये २१ अहवाल तर रॅपीड टेस्टमद्ये २० जणांच्या अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ६३ तर रॅपिड टेस्टमधील २२३ अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथील एक महिला, मेहकर मधील तीन, लोणी गवळी येथील तीन, डोणगाव येथील सात, जळगाव जामोद येथील एक, देऊळगाव राजा येथील दोन, असोला जहांगीर येथील तीन, खामगावमधील सहा, चिखली येथील १२, जनुना येथील एक, मलकापूर येथील दोन अशा ४१ जणांचा यात समोश आहे.दरम्यान, मंगळवारी १६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय संकेतानुसार रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये नांदुरा येथील दोन, मलकापूर येथील लखानी चौकातील एक महिला, चिखली शहरातील आनंद नगरमधील दोन जण, जळगाव जामोद येथीलही दोन, खामगावातील सात, नांदुरा तालुक्यातील खालखेड येथील एका महिलेचा समावेश आहे.दुसरीकडे आतापर्यंत संदिग्ध रुग्णांपैकी सात हजार ७५१ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असून आजपर्यंत ६८८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या १८४ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा असून २९ जुलै रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या एक हजार १०१ झाली असून ३८६ जणावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असून जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढले आहेत.