बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात ४२५ बालकांचा मृत्यू;आरोग्य विभाग सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:44 AM2018-01-11T00:44:03+5:302018-01-11T00:44:18+5:30
बुलडाणा : प्रभावी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात यंत्रणा सतर्क असली तरी वर्षभरात 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात ३७३ नवजा त अर्भकांचा समावेश असून, ८ स्तनदा मातांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाल व मा ता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रभावी आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात यंत्रणा सतर्क असली तरी वर्षभरात 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात ३७३ नवजा त अर्भकांचा समावेश असून, ८ स्तनदा मातांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाल व मा ता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला असून, ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनेंतर्गत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शहरासह ग्रामीण भागात आजही कुपोषण, विविध आजार, अज्ञान, जुन्या परंपरेमुळे आधुनिक उपचार घेण्यासाठी अनेक महिला पुढे येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक विवाहित महिला गरोदर राहण्याच्या काळापासून काळजी घेताना दिसून येत नाही त. त्यामुळे उपजत, नवजात अर्भक तसेच 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या अवस्थेमुळे अनेक वेळा मातांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर २0१७ दरम्यान 0 ते ५ वर्षे वयोगटातील ४२५ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 0 ते १ वर्षाखालील ३७३ नवजात अर्भकांचा समावेश आहे. तसेच ८ स्तनदा मातांचा मृत्यू झाला आहे. सदर माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून, शहरी भागासह ग्रामीण भागात या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. बालमृत्यूंची संख्या पाहता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात मोठी काळजी घेणे या स्थितीत क्रमप्राप्त ठरत आहे.
कुपोषणामुळे १६८ उपजत मृत्यू
जिल्ह्यात विविध कारणांमुळे बालमृत्यू झाले असले तरी मुख्य कुपोषणामुळे १६८ उपज त मृत्यू झाले आहेत. कुपोषणामुळे आईच्या पोटात असलेल्या बाळाचे पोषण होत नाही. त्यामुळे अशा बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मृत्यू होत असते. अशा प्रकारे १६८ उपजत मृ त्यू झाले आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यात १८, चिखली २१, देऊळगाव राजा १३, सिंदखेड राजा १, लोणार १२, मेहकर २0, खामगाव २0, शेगाव १२, संग्रामपूर १0, जळगाव जामोद १0, नांदुरा ८, मलकापूर ९ व मोताळा तालुक्यातील १४ उपजत मृत्यूचा समावेश आहे.
आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणार्या योजना
जिल्ह्यातील माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात एका वर्षापर्यंत गरोदर मा तांची काळजी घेण्यासाठी जननी सुरक्षा योजना, मातेसाठी घर ते हॉस्पिटल येणे, जाणे, औषध तसेच सोनोग्राफीसह विविध तपासण्यांसाठी जननी शिशू सुरक्षा योजना, संपूर्ण गरोदर काळात ५ हजारापर्यंत अनुदान देणारी प्रधानमंत्री मातृवंदन योजना, गरोदर काळात दर महिन्याला ९ तारखेला तज्ज्ञामार्फत मोफत तपासणीसाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जिल्ह्यातील ७ तालुक्यांसह २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गरोदरमाता, स् तनदामाता तसेच बालकांची मोफत तपासणी व उपचारासाठी मानव विकास मिशन तसेच नियमित लसीकरण मोहीम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील माता व बालमृत्यू प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्वच यंत्रणा तत्पर असून, येणार्या काळात शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळाल्यामुळे माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
-डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा