४.३१ लाख शेतकर्‍यांची धान्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:56 AM2017-09-22T00:56:13+5:302017-09-22T00:56:52+5:30

बुलडाणा : शेतकर्‍यांसाठी असलेले धान्य शासकीय स्तरावरू विलंबाने मिळत आहे तर अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थ्यांपर्यत सदर धान्य पोहचवितच नसल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्यासाठी प्रत्येक महिन्याला पायपीट करावी लागते.

4.31 lac peasants for the grains | ४.३१ लाख शेतकर्‍यांची धान्यासाठी पायपीट

४.३१ लाख शेतकर्‍यांची धान्यासाठी पायपीट

Next
ठळक मुद्देदर महिन्याला होतो विलंब शेतकर्‍यांसाठी जिल्ह्यात येते २१५५0 क्विंटल धान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकर्‍यांसाठी असलेले धान्य शासकीय स्तरावरू विलंबाने मिळत आहे तर अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थ्यांपर्यत सदर धान्य पोहचवितच नसल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्यासाठी प्रत्येक महिन्याला पायपीट करावी लागते.
दुष्काळामुळे शेतकर्‍यांसाठी एपीएल धान्य वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.  केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने स्वस्त धान्य योजना शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आली असून, जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार २११ लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अल्प दरात देण्याची ही योजना आहे. तांदूळ ३ रुपये किलो, तर गहू २ रुपये किलो दराने या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यासाठी गहू ४ ७ हजार २४0 क्विंटल तर तांदूळ ४ हजार ३१0 क्विंटल पुरवठा केला जातो. मात्र  वारंवार या धान्याचे वितरण विलंबान होते. तर कधी स्वस्त धान्य दुकानदारच सदर योजनेचे धान्य शेतकरी लाभार्थ्यांपर्यत पोहचवत नाहीत. जून महिन्याचा तांदुळ तर अद्यापपर्यंत मिळालाच नाही. गहू व तांदळाच्या खरेदीचे दर वाढले आहेत. त्यामुळे शासकीय गोदामातून धान्याची उचल झाल्यानंतर सदर गाडी बाहेरच काळ्याबाजारत जात असल्याचे प्रमाण वाढले आहे. गहू व तांदूळ काळ्याबाजार विक्री होत असल्याने प्रशासनाकडूनही कार्यवाहीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर पथक नेमण्यात आलेले आहे. त्यामुळे पथकाकडून चौकशी सुद्धा सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात या योजनेच्या सुरूवातीपासूनच प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचे धान्य वेळेवर पोहचले नाही. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने ही योजना सुरू आहे. परंतु, दरवाढीमुळे लाभार्थ्यांना गहू, तांदळाची प्रतीक्षा करावी लागत आहे.  

असा होतो शेतकरी लाभार्थींच्या धान्याचा पुरवठा 
४जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार २११ शेतकरी लाभार्थ्यांकरिता गहू १७ हजार २४0 क्विंटल व तांदुळ ४ हजार ३१0 क्विंटल पुरवठा होतो. त्यामध्ये बुलडाणा गहू  ५५२ क्विंटल व तांदूळ ४५0,  चिखली गहू १ हजार ९२६ व तांदुळ ४00 क्विंटल, अमडापूर गहू ५५२ व तांदूळ १00,  देऊळगाव राजा गहू १ हजार ७१ व तांदूळ ५00 क्विंटल, मेहकर गहू ७५८ व तांदूळ ४५0, डोणगांव गहू ६२४ व तांदूळ १५0 क्विंटल, लोणार गहू १ हजार ५८४ क्विंटल व तांदूळ ४00,  सिंदखेड राजा गहू १ हजार ५0५ क्विंटल व तांदूळ ३00 क्विंटल, साखरखेर्डा गहू १ हजार ५0  व तांदूळ ११0 क्विंटल, मलकापूर गहू ५९२ व तांदूळ २५0 क्विंटल, मोताळा गहू १ हजार ५६0 व तांदूळ २00 क्विंटल, नांदूरा गहू १ हजार ११३ व तांदूळ २00 क्विंटल, खामगांव गहू १ हजार ३५ व तांदूळ २00, शेगांव गहू १ हजार ४0६  व तांदूळ २00, जळगांव जामोद गहू १ हजार ३५७ व तांदूळ २00, संग्रामपूर गहू ५५५ व तांदूळ २00 क्विंटल पुरवठा करण्यात येतो. 

Web Title: 4.31 lac peasants for the grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.