बुलडाणा जिल्ह्यात ४३७ विद्यार्थ्यांंना हृदयविकार!

By admin | Published: August 24, 2016 12:03 AM2016-08-24T00:03:14+5:302016-08-24T00:03:14+5:30

राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाचा अहवाल: शाळा, अंगणवाडी व आश्रम शाळांमध्ये तपासणी.

437 students of heart of heart in Buldhana! | बुलडाणा जिल्ह्यात ४३७ विद्यार्थ्यांंना हृदयविकार!

बुलडाणा जिल्ह्यात ४३७ विद्यार्थ्यांंना हृदयविकार!

Next

विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. २३ : राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा, आश्रम शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात आली असून, यामध्ये ४३७ विद्यार्थी हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यासोबतच ७८६ विद्यार्थी अन्य आजारांनी ग्रस्त असून, शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी शाळेचे सत्र सुरू झाल्यानंतर जून ते मार्चपर्यंंंत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात येते. सदर तपासनीकरिता पथक तयार करण्यात आले असून, यामध्ये डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यावर्षी जुलै महिन्यात केलेल्या विद्यार्थ्यांंंच्या आरोग्य तपासणीतच जिल्ह्यात ४३७ मुले हृदयविकारासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंंंत ३५ आश्रम शाळांमधील ९३९५ विद्यार्थ्यांंंची आरोग्य तपासनी करण्यात आली. तसेच ३७१ शाळांमध्ये ४५ हजार ८९१ विद्यार्थ्यांंंची, २९0२ आंगणवाडींमधील १ लाख ७५ हजार ८२८ विद्यार्थ्यांंंची तपासनी करण्यात आली आहे. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ४३७ विद्यार्थ्यांंंपैकी १५९ विद्यार्थ्यांंंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर २३७ विद्यार्थ्यांंंंनी शासनाच्यामार्फत शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. ४१ विद्यार्थ्यांंंच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यासोबतच अन्य शस्त्रक्रियेस ७८६ विद्यार्थी शस्त्रक्रियेस पात्र ठरले आहेत. यापैकी ४६४ विद्यार्थ्यांंंंच्या शस्त्रक्रिया झाल्या असून, १९१ विद्यार्थ्यांंंंनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. १३१ शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. आरोग्य विभागात अनेक पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांंंंची आरोग्य तपासनी करण्यातही अडथळे निर्माण होत आहे.

जिल्ह्यात ३३ चमू कार्यान्वीत
बुलडाणा जिल्ह्यात शाळा, आंगणवाडी व आश्रमशाळांमध्ये जावून तपासनी करण्याकरिता एकूण ३३ चमूंची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १ चमू नगर पालिकेतील शाळांसाठी तर ३२ चमू ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांंंंची तपासनी करण्याकरिता नियुक्त करण्यात आली आहे.

शासनाच्यावतीनेच करण्यात येते शस्त्रक्रिया
शासनाने नेमणूक केलेली चमू शाळांमध्ये तपासनी केल्यानंतर विद्यार्थ्यांंंंला कोणता आजार झाला, याची माहिती देते. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची ग्रामीण रूग्णालयात तपासनी करण्यात येते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला कोणता आजार आहे व त्यावर उपचार किंवा शस्त्रक्रिया कोठे करावी, हे निश्‍चित करून त्यानुसार उपचार केले जातात.

शाळा सुरू झाल्यापासून मार्च महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासनी करण्यात येते. त्यानुसार सध्या शाळांमध्ये चमू आरोग्य तपासनी करण्यात येत आहे. आजारी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत.
- डॉ. शिवाजी पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा

Web Title: 437 students of heart of heart in Buldhana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.