मेडशी परिसरातील ४४ शेतकरी कर्जमाफीस पात्र !
By admin | Published: July 7, 2017 08:10 PM2017-07-07T20:10:11+5:302017-07-07T20:10:11+5:30
मेडशी - राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीस मेडशी परिसरातील १० गावातील केवळ ४४ शेतकरी सभासद कर्जमाफीस ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी - राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीस मेडशी परिसरातील १० गावातील केवळ ४४ शेतकरी सभासद कर्जमाफीस ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शाखा मेडशी अंतर्गत एकूण १० सेवा सहकारी सोसायटी येतात. मेडशी, खैरखेडा, पांगराबंदी, सुदी, देवठाणा, वारंगी, ब्राह्मणवाडा, भौरद, मारसूळ, राजूरा अशा दहा गावातील सेवा सहकारी सोसायटीतर्फे जवळपास अडीच हजार सभासदांना पीककर्ज वाटप केले जाते. यापैकी केवळ ४४ शेतकरी सभासद कर्जमाफीस पात्र ठरत असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात आले. सन २०१२-१३ ते २०१५-१६ या वर्षात पीककर्ज काढणाऱ्या; परंतू ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत पीककर्ज माफ होणार आहे. पीककर्ज माफीसंदर्भात अटी व शर्तींची पुर्तता करणारे १० गावांतील ४४ शेतकरी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी २००९ नंतरच्या थकित शेतकऱ्यांनादेखील कर्जमाफीच्या कक्षेत आणल्याची घोषणा केल्याने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या मेडशी परिसरातील १० गावांतील शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.