महिलांच्या नावे बीअर बारचे ४५ परवाने
By Admin | Published: March 10, 2015 01:58 AM2015-03-10T01:58:45+5:302015-03-10T02:11:51+5:30
सर्वाधिक परवाने बुलडाण्यात; शेगाव येथे एक, मातृतीर्थ सिंदखेडराजात दोन परवाने.
बुलडाणा : चंद्रपूरपाठोपाठ अमरावती आणि आता बुलडाणा जिल्ह्यातही दारूबंदीसाठी सामाजिक संघटना, महिला बचतगट पुढे सरसावले असले तरी जिल्ह्यातील २0 टक्के दारूची दुकाने महिलांच्या मालकीची असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात २३२ बीअर बार व परमीट रूम आहेत. यापैकी तब्बल ४५ बार व परमिट रूमची मालकी महिलांकडे आहे, तर चार बारमध्ये महिलांची भागिदारी आहे. दारूची नशा संसाराची राखरांगोळी करते. दारू ही शरीराला तसेच समाजाच्या स्वास्थ्यालासुद्धा घातक आहे. सुखी संसाराची वाताहत होण्यासाठी दारू हे एक मोठे कारण आहे. जिल्ह्यात आजवर दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, हे नाकारता येत नाही. अशा या अवदसा दारूला वेशीबाहेर काढण्यासाठी मागील दोन वर्षात अनेक गावांमधून महिला संघटना तसेच महिला बचतगट सदस्यांनी एल्गार पुकारला आहे. कुठे देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांनी आंदोलन केले, तर कुठे गावठी व बेकायदेशीर देशी दारूच्या विक्रीवर पायबंद घालण्यासाठी महिलांनी कंबर कसली. यामध्ये काही ठिकाणी या महिलांच्या आंदोलनाला यश येऊन उभी बाटली आडवी झाली, तर काही ठिकाणी महिलांचा हा लढा सुरूच आहे. एकीकडे काही सामाजिक कार्यकर्त्या महिला दारूबंदीसाठी चळवळ उभी करून लढा देताना दिसता त, तर दुसरीकडे याच राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात महिलांच्य् नावाने बीअर बार, वाइन शॉपीचे लायसन्स असल्यामुळे या आंदोलनांना छेद दिला जात असल्याचे चित्र आहे. एकूणच जिल्ह्यात दारूबंदी होण्यासाठी महिलांचा पुढाकार महत्त्वाचा असून, महिलांनीच मनावर घे तल्यास जिल्ह्यात दारुबंदी होण्यासाठी वेळ लागणार नाही. दारुबंदी झाल्यास व्यसनापासून तरुण िपढी वाचेल व उद्ध्वस्त होणारे संसारसुद्धा सुखाने नांदतील तसेच सामाजिक स्वास्थसुद्धा सुदृढ राहील.