बुलडाणा जिल्ह्यात ४५ सेंद्रिय शेतकरी गट: शेतकऱ्यांचा वाढता कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:59 AM2018-09-29T11:59:33+5:302018-09-29T12:06:45+5:30
खामगाव: रासायनिक खते, औषधांच्या वापराने दिवसेंदिवस खराब होत चाललेली जमिनीची पोत तसेच शेतकºयांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे.
- देवेंद्र ठाकरे
खामगाव: रासायनिक खते, औषधांच्या वापराने दिवसेंदिवस खराब होत चाललेली जमिनीची पोत तसेच शेतकºयांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. जिल्ह्यात जुने तसेच वाढीव असे ४५ सेंद्रिय शेतकरी गट कार्यान्वित आहेत. यातून जमिनीची सुपिकता वाढत असून शेतकºयांचा खर्चही कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे विपरीत परिणाम होत आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून रासायनिक खते व औषधांमुळे जमिनीची पोत खराब झाली आहे. निसर्गही साथ देत नसल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे. ही परिस्थिीती विचारात घेता, वारेमाप खर्च टाळून शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, याबाबत शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या ४५ सेंद्रिय शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी सामुहिक पध्दतीने सेंद्रिय शेती करीत आहेत. खामगाव तालुक्यात काळेगाव येथे श्री कानिफनाथ महाराज सेंद्रिय शेतकरी गट, वाकुड-कुºहा येथे शाश्वत सेंद्रिय शेतकरी गट, पिंप्राळा येथे सुपो महाराज सेंद्रिय शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात ५० शेतकरी असून प्रत्येक गटाद्वारे ५० एकरावर सामुहिक पध्दतीने सेंद्रिय शेती करण्यात येत आहे. या गटातील शेतकºयांनी रासायनिक खत, औषधांचा वापर टाळून गांडूळखत, निंबोळी अर्क आदींचा वापर सुरू केला आहे. वाढीव गटात कोंटी येथील ज्ञानगंगा सेंद्रिय शेतकरी गटाचा समावेश आहे. या गटात २१ शेतकरी असून त्यांनीसुध्दा ५० एकरात सेंद्रिय शेती सुरू केली आहे. यातील ४० एकरावर सेंद्रिय पध्दतीने ऊसाची लागवड कोंटी येथील शेतकºयांनी केली आहे. या ऊस शेतीला ह्यआत्माह्ण चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी भेट देऊन पाहणी सुध्दा केली आहे. खामगाव तालुक्यात सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांना आत्मा कडून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वाय.एस.पडोळ, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एन.एस.नागे यांच्याकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पाणी पातळीतही होतेय वाढ
सेंद्रिय शेतीतून जमिनीची पोत तर सुधारत आहेच, शिवाय विहीरीतील पाणीपातळीतही वाढ होत असल्याचे वाकुड-कुºहा येथील शाश्वत सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष शिवाजी शालीग्राम लाहूडकर यांनी सांगितले. गांडूळ खताच्या वापरामुळे जमिन सछिद्र होत आहे. यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी मुरते. परिणामी शेतातील विहीरीची पाणीपातळी वाढली असल्याची माहिती लाहूडकार यांनी दिली.
सेंद्रिय शेती ही लोकचळवळ व्हावी!
अलीकडे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. परंतु हे प्रमाण वाढले पाहिजे. प्रत्येक शेतकºयाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे. तरच येणार काळ सुखदायी असेल. अन्यथा भविष्यात जिकडे तिकडे बंजर झालेली जमिन पाहावयास मिळेल, असे मत सेंद्रिय पध्दतीने शेती करणारे शेतकरी व्यक्त करताहेत.
कोट.............
येणाºया काळात सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी सेंद्रिय ेशेतीसाठी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.
नरेंद्र नाईक,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
तथा प्रकल्प संचालक ह्यआत्माह्ण