मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे ४५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 11:20 AM2021-05-16T11:20:37+5:302021-05-16T11:22:09+5:30
Corona virus in buldhana : गावातील ५९२ जणांच्या पैकी अद्यापही १५० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
डोणगाव: मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख या गावात तब्बल ४५ जण एकाच वेळी कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान गावातील ५९२ जणांच्या पैकी अद्यापही १५० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.डोणगाव येथून जवळच असलेल्या उमरा देशमुख गावामध्ये डोणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई व कर्मचाऱ्यांनी गावातील ५९२ जणांचे स्वॅब दहा मे रोजी घेतले होते. दरम्यान त्यापैकी ४४० जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यात ४५ जण कोरोना बाधित आढळून आले. अद्यापही १५० जणांचे अहवाल येणे बाकी आहे. मात्र एकाच वेळी गावात ४५ जण कोरोना बाधित आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे गावाची लोकसंख्या व बाधितांचे एकंदरीत प्रमाण पाहता प्रसंगी गाव परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सोबतच प्रसंगी गावात आणखी एखादा कॅम्प घेऊन संदिग्ध नागरिकांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे.