रेशनचा ४.५ क्विंटल तांदूळ पकडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:54 PM2020-08-28T12:54:07+5:302020-08-28T12:54:15+5:30
काळ्याबाजारात जात असलेला तब्बल साडेचार क्विंटल तांदूळ बुधवारी सायंकाळी पकडण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेल्या तांदळाची विक्री करण्यात आली. त्यानंतर काळ्याबाजारात जात असलेला तब्बल साडेचार क्विंटल तांदूळ बुधवारी सायंकाळी पकडण्यात आला. त्यामुळे परिसरात राशन तांदळाची तस्करी करणारे एक मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे दिसून येते.
खामगाव तालुक्यात गत दोन-तीन महिन्याच्या कालावधीत रेशन तांदळाची खरेदी-विक्री करण्याच्या तब्बल १० पेक्षा जास्त घटना उघडकीस आल्या. यापैकी ७ घटनांमध्ये पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बुधवारी सायंकाळी खामगाव तालुक्यातील आवार येथे भंगार व्यावसायिक लाभार्थ्यांकडून तांदूळ घेऊन जात असताना साडेचार क्विंटल तांदूळ वाहनासह पकडण्यात आला. त्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. खामगाव तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात एमएच २८ बी १६५० या क्रमांकाचे छोटे मालवाहू वाहन ताब्यात घेतले.