‘एटीएम’चा नंबर विचारून खात्यातून ४५ हजार लंपास!

By admin | Published: April 3, 2017 03:21 AM2017-04-03T03:21:14+5:302017-04-03T03:21:14+5:30

बँक अधिकारी असल्याचे खोटे सांगून बंद एटीएम कार्ड चालू करण्यासाठी माहिती घेऊन खात्यातून ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास.

45 thousand Lampas from the account by asking number of ATMs! | ‘एटीएम’चा नंबर विचारून खात्यातून ४५ हजार लंपास!

‘एटीएम’चा नंबर विचारून खात्यातून ४५ हजार लंपास!

Next

धामणगाव बढे (जि. बुलडाणा), दि. २- बँक अधिकारी असल्याचे खोटे सांगून बंद एटीएम कार्ड चालू करण्यासाठी माहिती घेऊन खात्यातून ४५ हजार रुपयांची रक्कम अवघ्या पाच मिनिटात काढल्याचा खळबळजनक प्रकार धा.बढे येथे घडला. १ एप्रिलनिमित्त बँकांचे सर्व व्यवहार बंद असताना सदरहू शेतकर्‍याने बँकेजवळ येऊन एटीएम कार्डसंदर्भातील माहिती दिली.
ब्राह्मंदा येथील अल्पभूधारक शेतकरी परसराम जाधव यांचा मुलगा सुरेश जाधव यांना १ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता ८८७७९९३१३३ या मोबाइल नंबरवरून फोन आला. बँकेतून बोलतो असे सांगत बंद पडलेले एटीएम कार्ड चालू करण्यासाठी माहिती पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदरहू शेतकरी दुपारी बारा वाजता आपल्या दोन मुलांसोबत धा.बढे येथे स्टेट बँकेत गेले; परंतु १ एप्रिल रोजी आर्थिक वर्षाच्या समाप्तीनिमित्त बँकेचे व्यवहार बंद होते, तर अंतर्गत ताळेबंदासाठी बंद दरवाजाच्या आत काम सुरू होते. याची पूर्वकल्पना फोन करणार्‍याला होती. त्यामुळे त्याने अगोदरच बँकेजवळ आल्यावर फोन करण्याचे सदरहु शेतकर्‍यास सांगितले होते. त्यामुळे सदरहू शेतकर्‍याने आलेल्या नंबरवर फोन केला व बँक बाहेरून बंद असल्याचे सांगितले. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने मी बँकेतूनच बोलत आहे. तुम्ही मी विचारतो ती माहिती द्या, असे सांगितले. त्यामुळे परसराम जाधव व सुरेश जाधव या पिता-पुत्रांनी विचारलेली पूर्ण माहिती दिली. त्यावेळीच बँकेत काम करणारे राहुल चव्हाण हे काही कामानिमित्त बाहेर आले. त्यावेळी परसराम जाधव यांनी असा फोन आल्याचे सांगितले तर परसराम जाधव यांनी राहुल चव्हाणसह शाखाधिकारी आशिष दुबे यांची भेट घेतली. संबंधित शेतकरी फसविल्या गेल्याची बाब उपस्थितांच्या लक्षात आली, तर अवघ्या पाच मिनिटात परसराम जाधव यांच्या खात्यातून ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे उघड झाले. त्यानंतर परत त्याच नंबरवर जाधव यांनी फोन केला असता तुमचे एटीएम कार्ड लवकरच सुरू होईल, असे सांगत फोन बंद केला. बँकेसमोर येऊन स्वत: फोन करून माहिती देण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली.

Web Title: 45 thousand Lampas from the account by asking number of ATMs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.