बुलडाणा जिल्ह्यातील ३८१ पाणीपुरवठा योजनांसाठी हवेत ४५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:24 AM2021-02-13T11:24:27+5:302021-02-13T11:24:40+5:30

Water supply schemes in Buldana district जवळपास ४५० कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. 

450 crore in the air for 381 water supply schemes in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील ३८१ पाणीपुरवठा योजनांसाठी हवेत ४५० कोटी

बुलडाणा जिल्ह्यातील ३८१ पाणीपुरवठा योजनांसाठी हवेत ४५० कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सुमारे २६ लाख नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ३८१ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यापैकी त्यासाठी जवळपास ४५० कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. 
जलजीवन मिशनअंतर्गत सर्वांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील या उपक्रमाची नेमकी  स्थिती काय? तथा योजना प्रत्यक्षात नेमक्या कधीपर्यंत पूर्ण होतील, यासंदर्भाने माहिती घेतली असता ही बाब समोर आली. या ३८१ याेजनांपैकी ६२ योजनांना गेल्या आर्थिक वर्षातच मान्यता देण्यात येऊन त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, २४८ नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.  राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत १११ योजना जिल्हा परिषद व चार योजना जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या पूर्ण करण्यात येत आहे. त्यांचीही कामे अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील जवळपास १६ योजनांची कामे पूर्ण झाली.
दरम्यान, जलजीवन मिशनअंतर्गत नवीन ५७ योजना जिल्हा परिषदेंतर्गत, तर जीवन प्राधिकरणांतर्गत पाच योजनांची कामे हाती घेण्यात येणार आहे. या ६२ योजनांचा डीपीआरही यंत्रणांनी पूर्ण केला आहे. पैकी २७ योजनांचे डीपीआर तयार करण्यात आले असून, त्यातील नऊ योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या योजनांची कामे अल्पावधीतच सुरू होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. दुसरीकडे निर्माणाधीन योजनांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, त्यासाठी ११ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यापैकी १० कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च  झाला आहे.

४७ कोटी रुपयांची कामे सुरू
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ४७ कोटी रुपयांच्या योजना प्रगतिपथावर असून, या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या योजनांवर जवळपास ४६ काेटी रुपयांचा खर्च झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


मार्चअखेर बुलडाण्याला खडकपूर्णाचे पाणी
सुमारे ५७ किलोमीटर अंतरावरून बुलडाणा शहरासाठी ११३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या योजनेचे मार्चअखेर बुलडाणा शहरास पाणी उपलब्ध होणार आहे. येळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत त्याची जलवाहिनी तोवर पूर्ण होईल. खडकपूर्णा प्रकल्पातील  ९.५९ द.ल.घ.मी. पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास बुलडाण्यास दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा होईल.


दोन योजना कार्यान्वित
दीर्घ कालावधीपासून रखडलेल्या देऊळघाट, धाड, तिवाण नऊ गावे, रोहीणखेड आणि हिंगणे गव्हाड १३ गावे, या योजनांपैकी रोहीणखेड व हिंगणे गव्हाड १३ गावे, या योजना कार्यान्वित झाल्या  आहेत. त्यामुळे उर्वरित तीन योजनांची कामे प्राधान्याने करण्याची सूूचना आहे.

Web Title: 450 crore in the air for 381 water supply schemes in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.