बसमध्ये सापडलेले ४५०० रूपये केले परत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:20 PM2017-10-03T20:20:37+5:302017-10-03T20:21:11+5:30

देऊळगाव मही (बुलडाणा): चिखली आगारातील वाहक जी. आर. इंगळे व चालक व्ही. व्ही. कोल्हे यांना बसमध्ये आढळलेले पाकिट व ४५०० हजार रूपये संबंधित व्यक्तीला परत करण्यात आले. 

The 4500 rupees found in the bus was returned | बसमध्ये सापडलेले ४५०० रूपये केले परत 

बसमध्ये सापडलेले ४५०० रूपये केले परत 

Next
ठळक मुद्देचिखली ते पुणे रातरानी बसमध्ये सापडली रोखसापडलेले पाकिट ग्रस येथील माजी पंचायत समिती सभापती अरविंद पाटिल प-हाड यांचे 

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव मही (बुलडाणा): चिखली आगारातील वाहक जी. आर. इंगळे व चालक व्ही. व्ही. कोल्हे यांना बसमध्ये आढळलेले पाकिट व ४५०० हजार रूपये संबंधित व्यक्तीला परत करण्यात आले. 
चिखली ते पुणे रातरानी बसमध्ये कर्तव्यावर असताना जी. आर. इंगळे व व्ही. व्ही. कोल्हे यांना दिग्रस येथील माजी पंचायत समिती सभापती अरविंद पाटिल पºहाड यांचे पाकिट व त्यामध्ये ४५०० हजार रूपये सापडले. तसेच अन्य कागदपत्रे मिळून आली. जी आर इंगले यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून  चिखली आगारात बसस्थानक प्रमुख जोगदंड यांच्या हस्ते सदर पाकिट सुपूर्द केले. या प्रसंगी आगारातील कामगार संघटनेचे आगार सचिव राम नवले, भारत सुरडकर, भोलाने व सुरेश भवर व कामगार उपस्थित होते.

Web Title: The 4500 rupees found in the bus was returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.