चोरपांग्रा व किनगाव जट्टूमध्ये ४६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:41+5:302021-06-28T04:23:41+5:30
वेळीच येथील कोरोना संक्रमण नियंत्रणात न आणल्यास त्याची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या २० दिवसांपासून लोणार तालुक्यातील ...
वेळीच येथील कोरोना संक्रमण नियंत्रणात न आणल्यास त्याची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या २० दिवसांपासून लोणार तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, दोन गावांतच तब्बल ४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने आता या गावांकडे लक्ष केंद्रित केले आहे. २६ जूनपर्यंत तालुक्यात अवघे २० सक्रिय रुग्ण होते. त्यामुळे लवकरच तालुका कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; परंतु आता पुन्हा संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या दोन्ही गावांत अधिक सतर्कता बाळगून कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच या दोन्ही गावांतील बाधितांच्या संपर्कात असलेल्यांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यासोबतच या दोन्ही गावांत कोरोनाचे संक्रमण वाढण्याच्या कारणांचाही आरोग्य विभाग शोध घेण्याच्या तयारीत आहे.