अकोला जिल्ह्यात दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह; नऊ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 18:15 IST2020-12-11T18:00:46+5:302020-12-11T18:15:43+5:30
Akola Coronavirus News ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९८२४ झाली आहे.

अकोला जिल्ह्यात दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह; नऊ जण कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९८२४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तेल्हारा येथील पाच, रामदास पेठ येथील दोन, तर शिवाजी चौक, जठारपेठ, चिखलगाव, शिवानी, तुळजापूर ता. पातूर, जीएमसी हॉस्टेल, जुने शहर, खेडकर नगर, बार्शीटाक ळी, सिटी कोतवाली, केडीया प्लॉट, कुबेर नगर, खेतान नगर, कौलखेड, बोरगाव मंजू, माळीपूर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट व कापशी तलाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात स्वराज पेठ येथील चार, कॉटन मार्केट, अकोट, सिंधी कॅम्प, अकोट फैल, गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर कळंबा बु ता .बाळापूर, ज्ञानखेड, उरळ, रामनगर, गजानन नगर, जीएमसी, डाबकी, जगजीवनराम नगर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
नऊ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी सुर्यचंद्र हॉस्पिटल येथुन एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
७२५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.