वनविभागाच्या कारवाईत ५ लाखांचे सागवान जप्त; गोतमारा येथे मोठी कारवाई

By निलेश जोशी | Published: February 21, 2024 04:06 PM2024-02-21T16:06:46+5:302024-02-21T16:07:02+5:30

रात्रभर सुरू होती कारवाई

5 lakh teak seized in forest department action; Big action at Gotmara in buldhana | वनविभागाच्या कारवाईत ५ लाखांचे सागवान जप्त; गोतमारा येथे मोठी कारवाई

वनविभागाच्या कारवाईत ५ लाखांचे सागवान जप्त; गोतमारा येथे मोठी कारवाई

बुलढाणा: गिरडा परिसरातून अवैधरित्या सागवान तोडून नेणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत वनविभागाने केलेल्या चौकशीअंती एका सुताराच्या कामठ्यावर कारवाई करत वनविभागाने जवळपास १० घनमीटर गासवान, रंधा मशीन व इतर साहित्य असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

२० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपासून सुरू करण्यात आलेली ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता संपली. बुलढाणा वनपरीक्षेत्रातंर्गत गिरडा परिसरातून अवैधरित्या सागवानाची तोड होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांच्या आदेशानुसार एसीएफ अभिजीत ठाकरे यांनी सदर ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गिरडा परिसरात दोघेजण सागवान लाकूड घेऊन जातांना दिसून आले.

वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला असता एक जण फारर होण्यात यशस्वी झाला तर मनोहर तायडे (रा. हनवतखेड, ता मोताळा) यास वनविभागाने ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता तोडलले लाकूड हे गोतमारा येथील सुतार सुभाष वसंता चव्हाण यास विकत असल्याचे त्याने सांगितेल. त्यावरून एसीएफ अभिजित ठाकरे यांनी अधिकची कुमक सोबत घेऊन गोतमारा येथे सुभाष चव्हाण यांच्या कामठ्यावर छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी काही मुद्देमाल त्यांना मिळाला. यातील काही लाकूड हे अधिकृत परवानगीचे होते तर परवानगीच्या आड काही अवैध सागवान लाकूड वापरून साहित्य बनवून विकत असल्याचेही यावेळी चौकशीत समोर आले.

प्रकरणी रात्रीच कारवाी करत सुभाष चव्हाण यांच्या शेतातून अवैधरित्या साठवलेले लाकूड देखील जप्त करण्यात आले. या कारवाईत वनविभागाने जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन ट्रॅक्टर, एक मालवाहू वाहन व एका शासकीय वाहन असे पाच वाहनात जप्त केलले लाकूड हे वन विभागाच्या बुलढाणा येथील लाकूड डेपोत आणण्यात आले.या प्रकरणी तीन जणाविरुद्ध वन गुन्हा दाखल करून आरोपी मनोहर तायडे व सुभाष वसंता चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार अद्याप फरार आहे. या कारवाईत वनपाल मोहसिन खान, पी. आर. माेरे, वनरक्षक पी. पी. मुंढे, बी. एल. घुले, आर. एस. सुर्यवंशी, पी. एल. भांडे, राणी जोगदंड, रेखा पैठणे यांनी सहभाग घेतला.

Web Title: 5 lakh teak seized in forest department action; Big action at Gotmara in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.