मेहकरमध्ये पहिल्या टप्प्यात ५0 ग्रा.पं. निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:55 PM2017-09-07T22:55:20+5:302017-09-07T22:55:39+5:30
नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
उद्धव फंगाळ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
या निवडणुकीमध्ये सरपंच हा थेट जनतेमधून निवडून द्यायचा असल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस लागली असून, ज्या गावात निवडणूक होत आहे, त्या गावातील अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ, आजी-माजी बाशिंग बांधून निवडणुकीच्या वरातीत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मेहकर तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हिवरा साबळे सर्वसाधारण, अकोला ठाकरे अनुसूचित जाती, परतापूर नामाप्र महिला, सुकळी सर्वसाधारण महिला, उकळी नामाप्र महिला, सोनाटी सर्वसाधरण, घुटी नामाप्र, मिस्कीनवाडी अनुसूचित जा ती महिला, मुंदेफळ नामाप्र महिला, थार बरदापूर सर्वसाधरण, वडगाव माळी सर्वसाधारण महिला, कळ पविहिर सर्वसाधारण महिला, चिंचोली बोरे सर्वसाधारण महिला, पारडा सर्वसाधारण, बदनापूर अनुसूचित जाती, वरदडी वैराळ सर्वसाधारण, उसरण सर्वसाधारण महिला, भालेगाव सर्वसाधारण, कंबरखेड अनुसूचित जाती महिला, सोनार गव्हाण सर्वसाधारण, माळेगाव अनुसूचित जाती, पिंप्रीमाळी अनुसूचित जाती, साब्रा सर्वसाधारण महिला, खंडाळा नामाप्र, सारंगपूर नामाप्र, अंत्री देशमुख सर्वसाधारण महिला, बाभुळखेड सर्वसाधारण, कल्याणा सर्वसाधारण महिला, बरटाळा नामाप्र, आंधृड सर्वसाधारण महिला, भोसा अनुसूचित जाती महिला, मोळी सर्वसाधारण, दुर्गबोरी नामाप्र, पारखेड नामाप्र महिला, उटी नामाप्र महिला, वरवंड नामाप्र महिला, लोणी काळे सर्वसाधारण महिला, मांडवा फॉरेस्ट अनुसूचित जाती, नायगाव देशमुख अनुसूचित जाती, वडाळी नामाप्र, वागदेव सर्वसाधारण, दुधा अनुसूचित जमाती, पेनटाकळी सर्वसाधारण, पिं पळगाव उंडा अनुसूचित जाती, लव्हाळा सर्वसाधारण, लोणी लव्हाळा सर्वसाधारण, वरदडा अनुसूचित जमाती, हिवरखेड नामाप्र महिला, उध्वा विठ्ठलवाडी अनुसूचित जाती महिला, जनुना अनुसूचित जाती महिला इत्यादी गावामध्ये उपरोक्त आरक्षणानुसार सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणुका होत आहेत. तसेच ग्रा.पं. सदस्य पदांसाठीदेखील याचवेळी निवडणूक होणार आहे.
असा राहील निवडणूक कार्यक्रम
मेहकर तालुक्यात पहिल्या टप्प्यात ५0 ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. यामध्ये १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र घेणे, २५ सप्टेंबर नामनिर्देशन पत्राची छाननी, २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेणे व याच दिवशी निवडणूक चिन्ह देणे, तसेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते ५.३0 मतदान, तर ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी राहील, असे निवडणूक कार्यालय मेहकर यांनी कळविले आहे.
मेहकर तालुक्यात एकूण ९८ ग्रा.पं. आहेत. ज्या तालु क्यात जास्त ग्रा.पं.ची निवडणूक असेल, त्या संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू राहील. त्यानुसार ग्रा.पं. निवडणूक कार्यकाळात संपूर्ण मेहकर तालुक्यात आदर्श आचार-संहिता लागू असून, सदर आचारसंहि तेचे सर्वांनी पालन करावे.
- संतोष काकडे, तहसीलदार, मेहकर.