विद्यालयाच्या परिसरात ५० कडुलिंबाच्या वृक्षाचे वृक्षारोपन
By admin | Published: July 7, 2017 01:40 PM2017-07-07T13:40:54+5:302017-07-07T13:40:54+5:30
येथील भारत विद्यालयाच्या परिसरात ५०कडुलिंबाच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले.
बुलडाणा : एकच लक्ष चार कोटी वॄक्ष या महाराष्ट्र शासनच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत येथील भारत विद्यालयाच्या परिसरात ५० कडुलिंबाच्या झाडाचे वृक्षारोपन करण्यात आले. भारत विद्यालयातील हरित सेना, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षदिंडी काढुन वृक्ष लावण्यासाठी इतर विद्यार्थ्यांना आवाहान केले. सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने शाळेला ५० वृक्षांचा पुरवठा करण्यात आला होता. मुख्याध्यापक एस आर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत विद्यालयाच्या परिसरात हरित सेना व स्काऊट व गाईडच्या स्वंयसेवकांनी वृक्षारोपन केले. या वृक्षारोपन कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक राम पालवे, पर्यवेक्षक मोहन घोंगटे , दिपाली पाटील,बेबीताई धूंदळे,मनोज बैरागी,अरविंद पवार, शिवशंकर गोरे, सिध्दार्थ तायडे, राजेश आढे, दिनेश गर्गे,गजानन राठोड, विलास देवकर,देवलाल बडगे, नरेंद्र लांजेवार यांचेसह शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. मागिल वर्षी शाळेच्या परिसरात केलेल्या वृक्षारोपणातील सगळे वृक्ष जिंवत असल्याची माहिती मुख्याध्यापक उन्हाळे यांनी यावेळी दिली व यावर्षी लावलेल्या झांडांचे संगोपन शाळेतील विद्यार्थी व शिक्षक करतील हा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.