३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 11:19 AM2020-07-26T11:19:12+5:302020-07-26T11:19:58+5:30

प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

50 MLD of water released from Khadakpurna in 32 hours | ३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी

३२ तासात खडकपूर्णातून सोडले ५० दलघमी पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या ३४ तासापासून खडकपूर्णा अर्थात संत चोखामेळा सागरातून ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीत करण्यात येत असून अद्यापही प्रकल्पामध्ये पाण्याची मोठी आवक होत असल्याने प्रकल्पाचे १९ दरवाजे हे ६० सेंटीमिटरने उघडलेलेच असून आतापर्यंत ५० दलघमी पाणी या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरण चार वेळा भरेल ऐवढ्या पाण्याचा हा विसर्ग आतापर्यंत करण्यात आला आहे. दुष्काळी पट्टा म्हणून मराठवाड्याची २०१२ नंतर राज्यात ओळख झाली आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर मराठवाड्याने गेल्या वर्षी हक्क सांगत जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी या प्रकल्पारून इस्त्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून वाटर ग्रीड योजना कार्यान्वीत करण्याचा निर्णय तत्कालीन पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतला होता. ९२ गावांची पाणीपुरवठा योजना खडकपूर्णावरून कार्यान्वीत करण्याचे त्यावेळी ्प्रयोजन होते. त्यामुळे विदर्भ विरुद्ध मराठवाडा असा पाण्याचा संघर्ष त्यावेळी निर्माण झाला होता. राज्यस्तरावर हा मुद्दा त्या वेळी चांगलाच गाजला होता. मराठवाड्यातील कन्नड नजीक असलेल्या गौताळा अभयारण्यातून उगम पावणाºया खडकपूर्णा नदीचे बहुतांश पाणलोट क्षेत्र हे मराठवाड्यात येत असल्याने त्यावर मराठवाड्यातून हक्क सांगितल्या जात होता. दरम्यान २०१३ नंतर गेल्या वर्षी प्रथमच पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प भरला होता. ऐरवी मृत साठ्याची पातळीही गाठण्यात अपयशी ठरलेला हा प्रकल्प निसर्गाच्या कृपेमुळे गेल्या दोन वर्षापासून भरत आहे. यंदाही तो आता पर्यंत भरला असता. मात्र जुलै मधील ७० टक्के पाणीपातली राखण्यासाठी विसर्ग होत आहे.


मृत साठ्याची पातळीही गाठत नव्हता खडकपूर्णा प्रकल्प
२०१३ मध्ये प्रथमच पूर्ण क्षमतेने भरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात त्यानंतर मृतसाठ्याची पातळीही या प्रकल्पाने गाठली नव्हती. २०१८ मध्ये सिंदखेड राजा, लोणार व देऊळगाव राजा तालुक्यातील ४६ गावांचा पाणीप्रश्नही या प्रकल्पात पाणी उपलब्ध नसल्याने बिकट बनला होता. त्यावेळी नियमांना बगल देत नदीपात्रात या गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. आज मात्र निसर्गाच्या कृपेमुळे प्रकल्पाच्या मृतसाठ्याच्या (६० दलघमी) बरोबरीने प्रकल्पातून नदीपात्रात गेल्या ३२ तासात पाणी सोडण्यात आले. २४ जुलै रोजी पहाटे चार दरवाजे उघडण्यात आले होते. रात्री सर्व १९ दरवाजे ६० सेमीनेउघडण्यात आले असून अद्यापही ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा हा विसर्ग सुरू आहे.

Web Title: 50 MLD of water released from Khadakpurna in 32 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.