जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:39+5:302021-05-11T04:36:39+5:30
जिल्ह्यात दिवसागणिक कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर, कॉन्सट्रेटर यांची मागणी वाढली ...
जिल्ह्यात दिवसागणिक कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडर, कॉन्सट्रेटर यांची मागणी वाढली आहे. परिणामी ते कमी पडू लागले. अशा परिस्थितीत जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी एस़. रामामूर्ती यांनी मदत स्वरूपात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून एमसीसीआय (महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर) या संस्थेकडून जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व ५ बीआयपीपी मशीन देणार असल्याचे पत्र दिले. त्यानुसार संस्थेच्या पुणे येथील कार्यालयात हे साहित्य आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंटेनरसुध्दा पाठवून साहित्य जिल्ह्यात दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.